ट्रकच्या धडकेने इसमाला चिरडले,नागपूर हैदराबाद हायवेवर

वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत देवधरी फाटा वळण रस्त्यावर , प्रभाकर मारोती मांडवकर (५५) रा देवधरी रस्ता ओलांडताना पांढरकवडा कडून येणारा ट्रकने जबर धडक दिली त्याचे शरीर छिन्नविच्छिन्नQ झाले होते घटनास्थळी त्यांच्या मृत्यू झाला काही कळण्याच्या आतच सदर ट्रकने अपघात स्थळावरून पलायन केले ही घटना २७ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता घडली
या घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनला मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय करंजी येथे पाठविण्यात आले असून सदर ट्रक पेट्रोल पंपा वरून वडकी पोलीसांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती आहे .