
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वरूड जहागीर हे झाडगाव बाजारपेठेला जुळलेले मोठे गाव असून वरूड जहागीर येथे जिल्हा परिषदेची केंद्र शाळा असून पुढील शिक्षणासाठी विदर्थ्याना झाडगाव येथे बारावीपंर्यत शिक्षण असल्यामुळे जावं लागते, अशातचं कोरोनाच्या आजारामुळे गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी घरूनचं आंनलाईन शिक्षण घेत असल्यामुळे विद्यार्थ्याना शाळेत जायची आवश्कता पडत नव्हती, परंतू शिक्षण विभागाने ईयत्ता आठवी ते बारावीपंर्यत ऑफलाईन शिक्षण काही अटी ठेऊन सुरू केल्यामुळे विद्यार्थ्याना प्रत्यक्ष शाळेत जावे लागत असून विद्यार्थी आपल्या सोईनुसार मागे पुढे जात असून रोडच्या बाजूने झाडझुडपं खुप वाढून असून ज़गली डुकरासारखी जनावरे कुठेही निघतांना दिसत असल्यामुळे विद्यार्थी, वाटसरू लोकामध्ये भितीचे वातावरण तयार झाले असून या रोडला मैलकुली वगैरे आहे की नाही,कुणी बाबू, अधिकारी आहे किंवा नाही हे माहीतचं नसून यांना या रोडने कधीच पाहीले नसून हा रोड कुठल्या विभागाकडे आहे त्या विभागाने वरूड ते झाडगाव दुतर्फा रोडची झाडझुडपं तोडण्याची मागणी राळेगाव खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते सर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्धारे केली आहे.
