निंबादेवी येथे अवैद्यरित्या होत असलेली दारू विक्री त्वरित बंद करा ,ग्रामवासियांचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना तक्रार


तालुका प्रतिनिधी ,झरी नितेश ताजणे वनी

:पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या निंबादेवी येथे गेल्या काही वर्षापासून अवैधरीत्या दारूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे गावाचं परिसरातील लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते तर लहान मुलापासून सर्वच व्यसनाधीन होत असल्याची तक्रार करण्यात वरिष्ठाकडे करण्यात आली आहे आलेली आहे.
निंबा देवी येथील दारू विक्री बाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे समस्त ग्रामवास यांनी लेखी तक्रार देऊन गावातील अवधीत सुरू असलेली दारू विक्री त्वरित बंद करण्याची मागण
केली आहे तसेच याबाबत पाटण पोलीस स्टेशनमध्ये अनेकदा तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे तरी निंबादेवी येथील अवैद्यरित्या सुरू असलेली दारू विक्री कायमस्वरूपी त्वरित बंद करावी व अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या वर कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हाधिकारी राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे उपसरपंच अशोक शरलावार भीमराव गेडाम , अमोल तलांडे, गणेश आडे वसंता आत्राम शालिक मेश्राम कैलास आत्राम, लयमन्ना श रलवार, सतीश मडावी संतोष मेश्राम कमलाबाई परचाके सुरेखा मेश्राम तानाबाई मेश्राम यांनी केली आहे