
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होऊन २५ दिवसाचा कालावधी लोटला असला तरी अध्यापही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याने स्वातंत्र्यदिनी तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यां सह पालकांनाही पडला आहे.
दरवर्षी समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन संच पुरविण्यात येत होते यासाठी प्रति गणवेश तीनशे रुपये प्रमाणे अनुदान शाळा व्यवस्थापन समितीकडे उपलब्ध करून दिले जायचे त्यानुसार विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश वेळेवर मिळायचे पण यावर्षी त्यात बदल करून राज्य शासनाच्या शालेय
शिक्षण विभागाने ‘एक राज्य, एक गणवेश’ धोरणांतर्गत यंदाच्या सत्रात समग्र शिक्षाअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक नियमित, तर दुसरा स्काउट गाइडचा गणवेश देण्याची घोषणा केली. प्रभावी यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन चक्क २५ दिवस उलटले तरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशात शाळेत जावे लागत आहे.
समग्र शिक्षाअंतर्गत राज्यात पहिली ते आठवीच्या सर्व मुली व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले, तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो. गतवर्षीच्या शासन निर्णयानुसार दारिद्र्यरेषेवरील मुलांनाही या गणवेशाचे वितरण करण्यात येत आहे आता यंदा नियमित गणवेश व स्काउट गाइडचा गणवेश असे दोन गणवेश देण्यात येणार आहेत.नियमित गणवेश महिला बचत गटामार्फत शिलाई करून शासनस्तरावरून मिळणार आहे, तर स्काउट गाइडच्या गणवेशासाठी शाळा व्यवस्थापन समितीला कापड उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रत्यक्षात यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन २५ दिवस उलटले असतांना या बाबत शिक्षण विभाकडून माहिती घेतली असता एका गणवेशा करिता शासनाकडून कापड प्राप्त झाला असून बचत गटाच्या माध्यमातून शिवले जात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना १५ ऑगष्ट पूर्वीच गणवेश वितरित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
परंतु देशाचा स्वातंत्र्य दिन हा २० दिवसावर आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी तरी गणवेश मिळणार का, नाही असा प्रश्न तालुक्यातील पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
वर्ग एक ते आठवी शाळेतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासनाकडून कापड उपलब्ध झाला असून गणवेश शिवण्याचे काम अंतिम टप्यात आले असून तालुक्यातील वर्ग १ ते ८ जिल्हा परिषद शाळेतील तसेच जिल्हा परिषद हास्यस्कुल मधील असलेल्या वर्ग ८ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना अवघ्या काही दिवसातच म्हणजे ,स्वातंत्र्यदिना पूर्वीच शाळेचा गणवेश वितरित केला जाईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी चिंता करण्याची गरज नाही
प्रभारी गटशिक्षण अधिकारी
राजेंद्र काकडे
