
प्रतिनिधी ,प्रवीण जोशी.
ढाणकी
बिटरगाव, दराटी, कोर्टा, या वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीच्या संख्येत वाढ झाली असताना माध्यमातून कितीही बातम्या लावा कोणीच काही करू शकत नाही. अशा अविर्भावात अवैध तस्करी करणाऱ्यांना वाटते व यातच लाकूड तस्करांना वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा वचक नाही का? असा प्रश्न पर्यावरण प्रेमी जणांना वाटत आहे.
तसेच बिटरगाव, दराटी, कोर्टा हा परिसर अत्यंत घनदाट जंगल व या ठिकाणी या जंगलात वावरनारे हिंस्त्र प्राणी यासाठी सुद्धा हा परिसर प्रसिद्ध आहे. पण घनदाट जंगलाची वर्तमान परिस्थिती पाहता जंगल व परिसर अत्यंत विरळ होत चालल्याचे भयान त्रिकाल बाह्य धग धग ते वास्तव असून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कूचकामी व ढिसाळ धोरणामुळे अवैध रित्या लाकूडतोड्याचा पर्वकाळ आल्याचे दिसून येत आहे. वरील नमूद केलेल्या सर्वच वनपरिक्षेत्रातील कार्यालयाची अंतर्गत असलेल्या गावात बहुमूल्य सागवानासह लिंब, अंजन, चिंच, धावंडा, काट शेवरी, रोहन, अशा अनेक गैरींच्या झाडाची भरपूर प्रमाणात वृक्षतोड सुरू असून वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल व वन संरक्षक यांच्याच मुखसंतीने सदरचा सर्व प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे वन्यप्रेमीतून उघडपणे बोलले जात असून अवैध वृक्षतोड जोमात आणि वनविभाग मात्र आरामात अशीच परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे. त्यातच दिवसाढवळ्या तोडलेल्या झाडाचे ट्रक वाहतूक पास नसताना वनविभागाच्या नाक्यावरून बिनदिक्कतपणे कसे काय पास होतात….? याबाबत अनेक प्रकारच्या चर्चेना पेव फुटले असून वनविभागाच्या नाक्यावरून गैरी लाकूड घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला ठराविक रक्कम लावण्यात आल्याची ही स्फोटक चर्चा जनतेतून उघडपणे बोलले जात आहे.
1) महाराष्ट्रात झाडे तोडण्यासंबंधीचा कायदा अस्तित्वात असून अधिनियम 1966 मध्ये त्याबाबत नियम आहे.
2) तसेच वृक्षतोड मनाई कायदा 1968 पासून 6 चिंच, जांभूळ ,आंबा इत्यादी झाडे तोडण्यास बंदी आहे.
3) वनविभागाच्या परवानगीशिवाय कोणत्याही ठिकाणावरील कोणतेही वृक्ष तोडता येत नाही.
याचा बहुदा विसर वरील नमूद केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह वन विभागाला पडला असल्याने कोणत्याही प्रकारची वृक्षतोड परवानगी नसताना सर्वच गाव खेड्यातील गैरीची तोड मोठ्या प्रमाणात होत असून याउलट आश्चर्याची बाब म्हणजे आजपर्यंत वन विभागाची एकही कारवाई नाही हे विशेष 150 ते 200 गोलाई व 15 ते 20 वर्षे वय असलेल्या झाडाची अवैध वृक्षतोड सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन लाकूडतोडे ठेकेदार शेतातील बांधावरील नाल्याशेजारील जंगल व जंगला शेजारील गायरानातील झाडाची काही किमतीत खरेदी करून मशीनद्वारे झाडाची कत्तल करत आधुनिक मशीनच्या सहाय्याने ट्रक मध्ये भरत असल्याने हा गंभीर प्रकार संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल वनसंरक्षण यांना माहित नाही……? केवळ पगारीत भर पाडण्यासाठी चुप्पी साधली. हा प्रश्न न कळणारा होऊन बसला त्यामुळे सर्वच रेंजमध्ये होत असलेल्या या गैरप्रकार बरोबर उपवनसंरक्षक यांनी पथक पाठवून तपासणी करावी व दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी निसर्गप्रेमी बांधवासह जनतेतून होत आहे.
