एकात्मता रैली च्या सफलतेसाठी बैठकांचे सत्र सुरू

सहसंपादक : रामभाऊ भोयर

29/08/2024 रोजी अशोक मारुती मेश्राम व मित्र परिवाराकडुन एकात्मकता रैली चे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने कळंब व बाभुळगाव तालुक्यातील श्री अशोक मारुती मेश्राम व त्यांच्या मित्र परिवाराकडून बैठका चे संत्र सुरू आहे.अनेक गावांना भेटी देत असताना अनेक प्रतिष्ठित नागरिक,व लोक त्यांना ऐकण्यासाठी येत आहे,या बैठक संत्र दौऱ्यात ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडत आहे व मी कसा जनता जनार्दना चा उमेदवार आहे हे निक्षुणपणे सांगत आहे.आज रोजी प्रशासकीय सेवेचा उत्तम अनुभव त्यांच्या गाठीशी असुन गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते चोवीस तास मतदार संघात लोकांना उपलब्ध आहे, राळेगाव येथेच त्यांचे वास्तव्य असुन ते दिवसभर त्यांच्या कार्यालयात जनतेचे प्रश्न ऐकून घेतात व त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्या या बैठक संत्र दौऱ्यात त्यांच्या सोबत सुधीर भाऊ जवादे पाटील, कोडापे साहेब,मुन्नाभाई सैय्यद, गायकवाड भाऊ आदी लोक सोबत आहे..