
वणी तालुक्यातील निर्गुडा नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.बबीता बाळा बुरडकर (35) असे मृतक तरुणीचे नाव असून तिला अधुनमधून फिट येत असल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मंदर या गावालगत असलेल्या निर्गुडा नदिपात्रात आज गुरुवारी दि. 24 ऑगस्ट ला अंदाजे 2 :30 वाजता चे सुमारास तरुणीचा मृतदेह आढळून आला. सदर मृत तरुणी ही मतीमंद असुन तिला अधूनमधून फिट येत असल्याचे स्थानीक चौकशीतून समजले या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.
पुढील तपास पोलीस करत आहे.
