
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या शेतमालाला रस्ता भाव मिळवून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील तरुणांना बेरोजगारांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान देणारी योजना म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना असून या योजनेचा तरुण बेरोजगार युवकांनी तसेच पुरुष व महिला बचत गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा याकरिता कृषी विभाग राळेगांव च्या वतीने सूक्ष्म अन्न प्रिक्रिया उद्योगाची तालुकास्तरीय कार्यशाळा तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत घेण्यात आली .
या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग कार्यशाळेचे उद्घाटन तहसीलदार डॉ . रवींद्र कानडजे यांच्या हस्ते झाले तर या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी सूर्यवंशी हे होते .
या कार्यशाळेला तालुक्यातील शेतकरी , महिला शेतकरी , बचत गटातील सदस्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाविषयी सखोल मार्गदर्शन केले . तहसीलदार कानडजे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना किती महत्त्वाची आहे , हे सांगून तालुक्यातील शेतकरी , महिला शेतकरी , बचत गटांनी जास्तीत जास्त अर्ज या योजनेचा लाभ घ्यावा असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकारी , कृषी पर्यवेक्षक , कृषी सहायक तसेच सदर योजनेसंबंधी मार्गदर्शन व अर्जासाठी सुमित राऊत यांच्याशी संपर्क करावा , असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी यांनी यावेळी केले.
