धनगर मेंढपाळ परिवाराला सांत्वनपर भेट व शोकसभेचे आयोजन


राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)


वीज पडल्यामूळे दि.6 जुलै रोजी राळेगांव तालुक्यातील पंचवीस किलोमीटर दूर असलेल्या तेजनी जंगलात साहेबराव शिंदे यांच्या बारा मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या तसेंच मेंढपाळ बांधव शिवा करडे यांनी परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली होती त्यानिमित्ताने दि.16 जुलै रोजी तेजनी जंगलातील बेढ्यावर सांत्वनपर शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस संजय सोनाळे यांनी मेंढपाळांच्या समस्याचा पाढा सर्वांसमोर वाचून दाखविला या सांत्वनपर शोकसभेला राळेगाव मतदार संघाचे आ.डॉ.अशोकराव उईके,सुप्रसिद्ध मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. संदीपजी धवणे,जि.प.सदस्य चितरंजनदादा कोल्हे,राळेगांव पं.स. सभापती प्रशांतभाऊ तायडे,गजाननराव लढी, बाळासाहेब दिघडे,धनगर समाज संघर्ष समितीचे राळेगाव तालुका अध्यक्ष,मेंढपाळांचे नेते राळेगाव तालुका रुग्ण कल्याण समिती सदस्य,भटक्या जमाती राळेगांव तालुका अध्यक्ष डॉ. भिमराव कोकरे,मौर्यक्रांती संघाचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्रजी अडते,धनगर अधिकारी कर्मचारी संघटना यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवनराव थोटे, उपस्थित होते, यांनी सांत्वनपर परिवाराला सदिच्छा भेट दिली,त्यानिमित्ताने शोक सभेचे आयोजन केले होते आ.अशोकराव उईके यांनी वीज पडून मेंढया मृत्यूमुखी पडलेल्या परिवाराला व आत्महत्याग्रस्त परिवाराला शासनातर्फे सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले यावेळेस डॉ.संदीपजी धवणे धनगर समाज सदैव मेंढपाळ परिवारा सोबत असून त्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, यावेळेस पवन थोटे यांनी मेंढपाळांना व मेंढ्याना विमा सुरक्षा कवच मिळवून देण्याची मागणी केली,कार्यक्रमाचे आयोजन व संचालन डॉ. भिमराव कोकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळा शिंदे यांनी मानले, यावेळेस राळेगाव तालुक्यातील दोनशे मेंढपाळ बांधव उपस्थित होते यावेळेस संदीपजी राऊत,संजयभाऊ सोनाळे,नथूजी सोनाळे,बाळाभाऊ शिंदे,नामदेवजी घुले,दशरथजी कचरे,जोतिरामजी कोकरे,राजूजी तिखुले,गुलाबराव कचरे, साहेबराव शिंदे आदी समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.