नृत्य स्पर्धेत अनुश्री गजेंद्र ठूणे प्रथम पुरस्काराची मानकरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

आदर्श दुर्गोत्सव मंडळ राळेगाव तर्फे घेण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेत राळेगाव येथील नृत्यांगना अनुश्री गजेंद्र ठुणे प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली.
सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असलेल्या राळेगाव येथील आदर्श दुर्गोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या हेतूने विविध स्पर्धेचे आयोजन नवरात्र निमित्त आयोजित केले होते, रांगोळी स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, समूह नृत्य ,स्पर्धा दांडिया, महाप्रसाद ,यासारखी विविध उपक्रम राबवून आदर्श दुर्गोत्सव मंडळ यांनी नेहमीच आदर्श निर्माण केला आहे.
लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी रांगोळी स्पर्धा ,समूह नृत्य ,स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते, गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या या नृत्य स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी आपली कला सादर करून आपल्या अंगी असलेल्या गुणाचा परिचय करून दिला होता ह्या एकल नृत्य स्पर्धेत राळेगाव येथील अनुश्री गजेंद्र ठुणे वर्ग 7 वा.हि प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली मानकरी ठरली. या स्पर्धेचे परीक्षण खंडाळकर मॅडम मार्कंडे य पब्लिक स्कूल यांनी केले.
या सांस्कृतिक व नृत्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामागे आदर्श दुर्गोत्सव मंडळाचे फिरोज भाऊ लाखांनी त्यांनी अथक परिश्रम केले, त्यांना समीर लाखांनी, मनोज भोयर ,इत्यादी आदर्श मंडळाच्या सदस्यांनी मोलाची

भूमिका पार पाडली.