
भद्रावतीतालुक्यातील बेलोरा गावात आरोबिंदो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. बेलोरा गावात ग्रामस्थ त्यांच्या प्रमुख मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे .
१.मौजा किलोणी – बेलोरा – जेना इजिमा १६ रस्ता गैरकायदेशिर पाणी बंद करून खोदकाम केल्याने शासकीय मालमत्तेचे नुकसान वा सार्वजनिक रस्ता बंद केल्यामुळे जिल्हा परिषद चंद्रपूर प्रशासन मार्फत कंपनी प्रशासन विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा व रस्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा
२.प्रकल्पात प्रस्तावित संपूर्ण ९३६ हे.आर.शेतजमिनीचे दर निश्चित करून शेतजमीन संपादित करण्यात यावा
३ बेलोरा गावाचा पुनर्वसनाचा मोबदला निश्चित करून तत्काळ पुनर्वसन करण्यात यावे
४.प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना किंवा त्यांचा वारसदारांना प्रकल्पात कायम स्वरुपी नोकरी मध्ये सामावून घेण्यात यावे यासाठी
१ श्री.प्रवीण ठेंगणे , माजी सभापती पंचायत समिती भद्रावती २ श्री.संगीता सुरेश देहरकर सरपंच बेलोरा २श्री. प्रभावती बोढाले सरपंच जेना
३श्री.प्रवीण मत्ते अध्यक्ष बेलोरा
४ श्री. हरिश्चंद्र आसुटकर उपसरपंच जेना
५ श्री.रितेश सातपुते
६ श्री.विनोद ताजने
८ श्री.सुमित मत्ते यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे.
