घरकुल लाभार्थ्यांचे उर्वरीत अनुदान न मिळाल्यास मनसेचा चक्काजाम
( गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मनसेचा आंदोलनाचा ईशारा)

सहसंपादक : रामभाऊ भोयर

शासनाच्या विविध घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला परंतु दुसरा हप्ता अद्याप न मिळाल्याने या लाभार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने या घरकुल लाभार्थ्यांना तत्काळ दुसरा हप्ता वितरीत करण्यात यावा अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्याचा ईशारा मनसेच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
राळेगाव तालुक्यामध्ये शबरी, रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असंख्य घरकुल लाभार्थी आहेत. त्यामध्ये त्यांना पाहिला हप्ता अनुदान प्राप्त झाले. परंतु उर्वरित अनुदान प्राप्त न झाल्याने या घरकुलांचे बांधकाम जशास तसे थांबलेले आहे. तर काही लाभार्थ्यांनी पैसे लवकर मिळतील या आशेपोटी व्याजाने कर्ज काढून घरकुलाचे काम पुर्ण केले आहे. परंतु अद्याप पैसे मिळाले नसल्याने काढलेल्या कर्जाचे व्याज वाढत आहे तसेच घराच्या अपूर्ण कामामुळे त या लाभार्थ्यांना पावसाळ्यात आपला संसार उघड्यावर थाटावा लागत आहे. याविषयी वारंवार या लाभार्थ्यांनी व मनसे पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार केला तशा मौखिक स्वरूपात सूचना केल्या होत्या. परंतु या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करतात त्यावर कुठलेही कारवाई करण्यात आलेली नव्हती.
त्यामुळे तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना तात्काळ उर्वरित अनुदान त्यांचा बँक खात्यात जमा करावे. जेणेकरून त्यांचे उर्वरित बांधकाम लवकरात लवकर चालू होऊन त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
अन्यथा येत्या १० दिवसांनंतर २३ सप्टेंबर २०२४ रोज सोमवारला पंचायत समिती कार्यालयाच्या गेट समोर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी तालूकाध्यक्ष सुरज लेनगुरे, उपाध्यक्ष गौरव चवराडोल, उपाध्यक्ष सचीन आत्राम, स्वप्नील नेहारे, ओम मडावी, सचिन आत्राम, प्रशांत पावडे, भारत निभूळकर, विलास पावडे, मंगेश मोहुर्ले , संदीप गुरुनुले ,अनिल वाढई , जगदीश ठाकरे, रोशन गुरुनुले, सुरज खैरे, उमेश तोडासे सह घरकुल लाभार्थी उपस्थित होते.