
स्थानिक ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष गटविकास अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरध आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या सावरखेडा येथील उपकेद्रा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य असल्याने येथील नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यातील सावरखेडा गावातील आरोग्य उपकेंद्राकडे जाणारा मुख्य रस्ता बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर तात्पुरता पर्याय म्हणून बाजूला असलेला लहान रस्ता चालू असला तरी तो पूर्णपणे गवत, चिखल आणि कचऱ्याने भरलेला आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्य केंद्रात जाताना अक्षरशः जीव मुठीत धरून जावे लागत आहे. सदर स्थानिक सर्व कार्यालयावर ग्रामपंचायत चे नियंत्रण असताना सुद्धा येथील ग्रामपंचायत सचिव, सरपंच कुंभकर्णीय झोपेचे सोंग घेऊन दिसत असल्याचे येथील स्थानिक नागरिकाकडून सांगितले जात आहे. सदर गवताळ व अस्वच्छ परिसरामुळे या रस्त्यावर साप, विंचू आणि इतर विषारी जीव जंतू चे वास्तव्य वाढले आहे तर या आरोग्य उपकेंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांना अनेक वेळा या रस्त्यावर साप व विंचू दिसल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे विशेषतः महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना आरोग्य उपकेंद्रात जाणे म्हणजे धोकादायक ठरले आहे. तर
स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना व गावातील स्थानिक प्रशासनांना तोंडी व लेखी तक्रार देऊन सुद्धा याकडे कोणीही लक्ष दिले नाही. सदर अधिकाऱ्यांच्या व स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची भावना गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
प्रतिक्रिया
सावरखेडा गावातील मुख्य रस्त्यापासून तर आरोग्य उपकेंद्राच्या गेटपर्यंत अंदाजे ५० मीटर परिसर पूर्णपणे कचऱ्याने भरलेला आहे तरी याकडे स्थानिक प्रशासन व येथिल अधिकारी या कडें दुर्लक्ष करत आहे. कचऱ्या मधून जाणाऱ्या ग्रामस्थांना सरपटणाऱ्या जीवजंतू पासून कमी अधिक झाल्यास याला जबाबदार कोण ? व घाणीच्या सम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून सदर संबंधी अधिकाऱ्यांनी या आरोग्य उपकेंद्राची पाहणी करून तात्काळ परिसर स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा आम्ही सर्व नागरिक स्थानिक प्रशासनाच्या व संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात उपोषणाला बसू
शैलेश आडे सामाजिक कार्यकर्ते सावरखेडा
