भटक्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करणारे एकलव्य फाउंडेशन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

विमुक्त भटक्या समाजातील विद्यार्थांच्या करियर ला दिशा देण्यासाठी एकलव्य चे बळ
जेतवन यवतमाळ येथे तीन दिवसीय निवासी करियर शिबिराचे दिनांक २९, ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी आयोजन.
आदिवासी आश्रम शाळा सोबतच्या यशस्वी प्रकल्पा नंतर यावर्षी एकलव्य इंडिया फाउंडेशन समाज कल्याण विभागाच्या वि जा भ ज आश्रम शाळां सोबत काम करत आहे. या प्रकल्पा अंतर्गत पहिल्या टप्प्यात १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण आणि करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आश्रम शाळांमधे जाऊन घेतल्या. त्यानंतर ७५ विद्यार्थ्यांची एका वर्षाच्या mentoring and coaching program साठी निवड केली. याची program ची सुरुवात पहिल्या ३ दिवसीय निवासी शिबिरातून आज यवतमाळ येथील जेतवन येथे झाली. या शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी श्री भाऊराव चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना संबोधित केले. या शिबिरात १५ पेक्षा जास्त mentor आणि विद्यार्थी मार्गदर्शक सहभागी झाले आहेत के देशातील नामांकित कॉलेज आणि विद्यापीठांत पदवीचे शिक्षण घेत आहेत. सहभागी विद्यार्थी तांड्यातले, पालावरचे असून बंजारा, धनगर (मेंढपाळ), बेलदार, गोपाळ, गवळी अशा भटक्या विमुक्त जाती जमाती मधून येतात.
जिल्ह्यात जवळपास चाळीस आश्रम शाळा समाज कल्याण विभागामार्फत चालवल्या जातात. यातील १७ आश्रम शाळांमधे उच्च माध्यमिक वर्ग आहेत. पायलट प्रकल्पा अंतर्गत यातील १० उच्च माध्यमिक आश्रम शाळांमधे एकलव्य इंडिया फाऊंडेशन समाज कल्याण विभागांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवत आहे.
वर्षभर मोफत मेंटोरिंग आणि कोचिंग:
सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या करियर च्या कला नुसार नामांकित विद्यापीठे आणि कॉलेज मध्ये शिकणारे मेंटोर दिले जाणार आहे जे त्यांना एडमिशन तयारी साठी मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच केंद्रीय विद्यापीठांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या CUET सारख्या प्रवेश परीक्षेसाठी कोचिंग वर्ग राबवले जाणार आहे.
शैक्षणीक सहली: शहरातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणाची ओळख करून देण्यासाठी दिल्ली किंवा पुण्यासाठी सारख्या शैक्षणिक हब मध्ये सहलींचे आयोजन केले जाणार आहे. यात देशातील नामांकित विद्यापीठे आणि आहे कॉलेज आणि तेथील शिक्षक विद्यार्थ्यांसोबत संवाद करण्याची संधी मिळणार आहे. तसेच समाज कल्याण विभागाचे शासकीय हॉस्टेल आणि विविध शासकीय संस्थांची ओळख करून दिली जाणार आहे.
उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती: या प्रकल्पाअंतर्गत देशातील नामांकित कॉलेज मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना scholarship साठी मदत केली जाणार आहे जेणेकरून ते आपले उच्च शिक्षण पूर्ण करू शकतील.
उच्च शिक्षण ते करियर पर्यंत सहकार्य: उच्च शिक्षण घेताना आणि पूर्ण केल्या नंतर नोकरी मिळवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत एकलव्य विद्यार्थ्यांसोबत असते. आतापर्यंत एकलव्यचे ५०० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंट च्या माध्यमातून नोकरीवर लागले आहेत.
या प्रकल्पाचे व्यवस्थापन एकलव्य तर्फे कोमल कोरडे करत असून त्यांचे सहकार्य आकाश सपकाळे करत आहेत. या प्रकल्पात समाज कल्याण विभाग प्रशासन आणि आश्रम शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे उत्तम सहकार्य लाभत आहे.

ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एका चौकटी पलीकडे करियर ची माहिती नसते. ही पारंपरिक चौकट मोडून बदलत्या काळातील दर्जेदार उच्च शिक्षण आणि करिअरचे मार्ग दाखवण्याचे काम एकलव्य इंडिया फाउंडेशन करत आहे. या उपक्रमातून आश्रम शाळांतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी जिल्हा समाज कल्याण विभाग प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत.”

श्री भाऊराव चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, यवतमाळ