
( महाराष्ट्र सरकार आश्वासन पाळा जिआर काढा)
सहसंपादक: रामभाऊ भोयर
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांनी गटप्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ, दरमहा आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये , कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व भाऊबीज. तसेच आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व भाऊबीज देण्याचा आस्वासन दिले परंतु अद्याप जीआर काढला नाही म्हणून 12/01/2024 पासून बेमुदत राज्यव्यापी संप सुरू केला असून आयटक सह कृती समितीने महाराष्ट्रात जिल्हा परिषद समोर आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांचे साकळी धरणे आंदोलन सुरू आहे आज 25 जानेवारी रोजी आंदोलनाला शेकडो आशा व गटप्रवर्तक महीला उपस्थित होत्या.
जिल्हा परिषद समोर आशा वर्कर गटप्रवर्तक महिलांनी सरकार विरोधात जोरदार नारेबाजी करत हल्लाबोल केला
महाराष्ट्रात 12 जानेवारी पासून आंदोलन सुरू असुन सरकार सुस्त आहे सरकारने कबुल केलेली वाढीचा शासन निर्णय काढण्यासाठी विलंब करीत आहेत त्यामुळे आरोग्य यंत्रणा प्रभावीवीत झाली आहे. यापुर्वी महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी 18 ऑक्टोबर 2023 पासून बेमुदत संप केलेला होता. त्यासंदर्भात महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पुर्तता केली नाही त्या घटनेस आज दोन महिने झाले आहेत. तरीसुद्धा जिआर अद्याप काढला नाही. महाराष्ट्र शासनाने जिआर काढला नसल्यामुळे महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मध्ये महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध असंतोष वाढत चाललेला असुन यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी या संपामध्ये जोरदार भागीदारी केलेली असून आज 25 ला सुद्धा मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक जिल्हा परिषद समोर बेमुदत साकळी आंदोलनाला उपस्थित होत्या यावेळी
कॉ.दिवाकर नागपुरे, सुनंदा कांबळे , अर्चना तोंडरे ,रंजना सोनोने , रंजना राउत , छाया खडककर , माया सातपुते, मंगला रांखुडे, सविता बरडे, रंजना वानखडे प्रतिभा ढोकने ,सुनिता जयस्वाल,माया मरस्कोले, अनिता मडावी, वंदना उईके, संध्या चिंचोलकर नागपुरे. सुजाता नगराळे, चंदा कांबळे. अनिता हाके. दैवशाला खंडारे माला जाधव छाया राठोड कविता उघडे सुनिता जयस्वाल वर्षा चौधरी प्रतिभा ढोकणे , महानंदा रामटेके सुनिता आसोले अर्चना कांबळे सुनिता पवार संगीता कुंभरे, मैना राऊत. वैशाली किरतकर. सुवाशिनी भगत. रेखा राजगडकर. सिमा लिंगनवार. अरुणा आसोले. सुनंदा कांबळे. रंजना सोनोने. सुरेखा सरग. महानंदा भगत. जुली राऊत. सुनिता आसोले. सविता बरडे. रंजना राऊत. मंगला सोनटक्के. अर्चना मेश्राम. सुजाता नगराळे. माया वाघमारे. अर्चना तोडरे. योगीता बोरेकार मंजुषा चिंचोरकर यासह शेकडो आशा व गटप्रवर्तक महीला आंदोलनाला उपस्थित होत्या….
