होमगार्ड अमित तिमांडे यांचा डिजी डिक्स मेडलसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार

सहसंपादक: रामभाऊ भोयर

वर्धा होमगार्ड कार्यालयातील अधिकारी रवींद्र चरडे व सैनिक अमित तीमांडे यांची राष्ट्रपती मेडलसाठी निवड जाहीर झाली त्यामुळे वर्धा होमगार्ड तालुका पथकाचे होमगार्ड सार्जेंट अमित शंकरराव तीमांडे यांची भारत सरकारकडून डिजी डिक्स मेडलसाठी निवड झाल्याबद्दल साप्ताहिक कवायतीवर तालुका समादेशक अधिकारी हेमलता कांबळे यांच्या हस्ते शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन होमगार्ड सार्जेंट अमित तीमांडे यांचा सत्कार करण्यात आला या प्रक्रियेत सहकार्य करणारे जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी रवींद्र चरडे यांचे मार्गदर्शन लाभले. तीमांडे यांनी सांगितले की मी 2006 पासून होमगार्ड सेवेत काम करीत आहेत या माध्यमातून बऱ्याच वेळी , ठिकाणी धावपळ करीत मदत केली उदा. अचानकपने सेलू येथे सिलेंडरने भयंकर पेट घेतला होता त्याला विझवण्यासाठी प्रयत्न केला व वर्धा शहरातील साई टायर दुकानाच्या वरील खोलीत मोठी आग लागली होती त्या आगीला फायर ब्रिगेडच्या साहाय्याने आग विजवत आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही तसेच पाचवर्षां अगोदर जिल्हाधिकारी वर्धा कार्यालयातून होमगार्ड कार्यालय वर्धा येथे दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली की देवळी तालुक्यातील दिघी-बोपापूर येथील नदी पुरामुळे पाण्याच्या टाकीवर अकरा नागरिकांनचा जीव धोक्यात असल्याचा माहिती मिळाली. सरकारी यंत्रणा पोहचण्याच्या अगोदर त्यांना वाचविण्यासाठी होमगार्ड आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातून अधिकारी व चार सैनिक जाऊन अकरा लोकांना सुखरूप बाहेर काढत जीव वाचविला. त्यात माझा सहभाग होता त्यामुळे माझी निवड झाल्याचे सांगितले. तर याप्रसंगी तालुका पथकाचे वरिष्ठ पलटण नायक बाबा तुरक , पलटण नायक चंद्रशेखर शेलकर , नितीन शेंडे , गजानन ससाने कार्यालयीन लिपिक राजू गुरुनुले , शिपाई विकास वाटमुळे यांच्यासह होमगार्ड उपस्थित होते.