“‘ नागपूर करार “‘ करुन कॉग्रेसी लोकांनी विदर्भातील लोकांची दिशाभूल केली.त्याचे परीणाम विदर्भवाद्यांना भोगावे लागत आहे – मधुसूदन कोवे गुरुजी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे यासाठी स्वातंत्र्य पुर्वी पासुन चळवळ चालू आहे.सि पी ॲड बेरार मध्यप्रदेश प्रांताची राजधानी विदर्भ असताना सुद्धा विदर्भ राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा ही अपेक्षा होती.परंतु १५ आगष्ट १९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला आणि भारतात प्रांत वार रचना निर्माण झाली त्यात प्रामुख्याने निजाम स्टेट, हैदराबाद संस्थान, आणि मध्य प्रांत, मध्यप्रदेश ( c p & berar ) तेव्हा मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब खेर म्हणून काम बघत होते सन १९४७ ते १९५२ हा कार्यकाल होता मग राज्य पुनर्रचना करण्यासाठी फजल अली कमिशन ची स्थापना केली आणि विदर्भातील अभ्यासु नेते ब्रिजलाल बियानी आणि माधव श्रीहरी अणे यांनी एक प्रस्ताव पत्रिका ठेवली. आम्ही महाराष्ट्र राज्यात समाविष्ट होवू परंतु महाराष्ट्राची राजधानी हे नागपूर असेल तेव्हा मुंबई मराठी राजकारणी लोकप्रतिनिधी नी आपण चर्चा करून निर्णय घेवु या साठी “‘ नागपूर करार “‘ करण्यात आला परंतु या करारानुसार आज ही महाराष्ट्राची राजकीय पुढारी विदर्भावर सातत्याने दुर्लक्ष आणि विश्वासघातकी भुमिका घेत आहे म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समीती ही “‘ नागपूर करार ची होळी “‘ करुन राज्य सरकार चा निषेध करतं आहे या आंदोलनात सहभागी मा कृष्णा जी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष,मा मधुसूदन कोवे गुरुजी जिल्हा उपाध्यक्ष मा विजय निवल, शेतकरी संघटना,मा संजय मेश्राम,प्रा हेमंत मुदलियार ,मा अरुण भाऊ जोग, जिल्हा अध्यक्ष जय विदर्भ पार्टी मा युवराज साबळे, जिल्हा अध्यक्ष युवा विदर्भ, श्रीधर ढवस, प्रल्हाद काळे, नितीन ठाकरे मा एस एम पाडसेनकुन गुरुजी, दुर्वास भगत चारुदत्त नेरकर, चंद्रशेखर ताम्हणे साहेब,मा दिलीप सिंह गौतम साहेब जिल्हा उपाध्यक्ष, आणि विविध संघटना चे पदाधिकारी या निषेध आंदोलन सहभागी होते.

                      - *