
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मोहदा:- पशुपालकांना त्यांच्या पशुधनासाठी त्वरित व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी येथील पशुसंवर्धन विभागाने ५/१२/२०२५, गुरुवार रोजी मोफत पशुसंवर्धन आणि आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
पशुपालकांचा उत्तम प्रतिसाद लाभलेल्या या शिबिरात विभागाच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांनी उपस्थित सर्व जनावरांची तपासणी केली. यामध्ये जनावरांना विविध रोगांवर वैद्यकीय औषधोपचार करण्यात आले, तसेच आवश्यक असणाऱ्या पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.
या शिबिरामुळे परिसरातील एकूण ७२ पशुधनावर (पशु/पशुपुट) मोफत उपचार शक्य झाले. पशुसंवर्धन विभागाने या वेळी शेतकऱ्यांना जनावरांची काळजी कशी घ्यावी, त्यांना सकस आहार कसा द्यावा, तसेच शासनाच्या पशुसंवर्धनाशी संबंधित योजनांची माहिती दिली. पशुपालनाचे महत्त्व व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही मार्गदर्शन करण्यात आले.
या यशस्वी आयोजनामुळे गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पशुसंवर्धन विभागाच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.सरपंच यांनी सर्वांचे आभार मानले
