हिमायतनगर तहसिल कार्यालय समोर धरणे आंदोलनात न्याय न मिळाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ता.अध्यक्ष तुकाराम तांडेलवारन दिला इशारा


अखिल भारतीय किसान मजदूर सभा व दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने
नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर काँ.अशोक घायाळ चपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय शहिद दिनी दि २३ मार्च २१ रोजी
हि. नगर ता अध्यक्ष तुकाराम तांडेरवार यांच्या शिष्टमंडळ सहित जमीन हक्कासाठी व दिव्यांगाच्या अनेक प्रश्नासाठी धरणे आंदोलन संपन्न झाले.
धरणे आंदोलन कोव्हिड संकटात व शासनाच्या नियमाचे पालन करून फक्त मोजकेच चार कार्यकर्ते तहसिल कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
शिष्टमंडळ यांनी तहसिलदार साहेब यांना भुमीहिन, दिव्यांगाना प्रत्येक कुटुंबाला पाच एकर शासकीय जमीन मिळावी.
२) दिव्याग वृध्द निराधार यांना दरमहा दहा हजार रुपये वेळेवर देण्यात यावा ईत्यादी सात मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले,
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ता अध्यक्ष तुकाराम तांडरेवार,किसन भाकरे,मल्लू पांगिरवाड,पांडुरंग गायकवाड,
भागाजी राकडे, राजु हाटेकर
अंकुश खिलारे, ईत्यादी कार्यकर्ते प्रसिध्दी पञक देण्यात आले.