जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नवोदय क्रीडा मंडळाचे सुयश,दर्यापूर येथे यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा पासिंग हॉलीबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते या स्पर्धेत १४ वर्षा आतील मुलांच्या संघात राळेगाव येथिल नवोदय क्रीडा मंडळाच्या संघाने विजय मिळवला आहे त्यामुळे आता राळेगाव येथिल मुलांचा संघ यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत अमरावती येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत विजयी संघात न्यू इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी असून त्यांचा सराव राजीव गांधी क्रीडा संकुल राळेगाव येथिल नवोदय क्रीडा मंडळाच्या मैदानावर घेण्यात येतो. विजयी संघात पुढील प्रमाणे खेळाडू होते मंथन ठाकरे, नैतिक चौधरी,
सुजल कांबळे, संविधान हिवरकर, वेदांत बोदडे, जयकांत शिकरे, पीयूष देशमुख, अर्पित राऊत, ओम कोसुळकर, सोहम सावळे, नयन पेंदोर, ओम वानखेडे यांनी सहभाग घेतला होता. विजयी संघाला नवोदय क्रीडा मंडळाचे प्रमुख महेश भोयर, जिल्हा पासिंग हॉलीबॉल संघटनेचे सचिव अतुल नेवारे, नरेश दुर्गे, गणेश काळे, प्रफुल्ल खडसे, मोनु खान, महेश राजकोल्हे, सचिन डोंगरे, सोनु खान, सूरज भगत, अंकित क्षीरसागर, मयुरी चौधरी, आचल सावसाकडे यांचे सहकार्य लाभले आहे. सोबतच न्यू एज्युकेशन सोसायटी, राळेगाव चे अध्यक्ष बी. के. धर्मे,सचिव डॉ. अर्चनाताई धर्मे, व शाळेचे मुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे, उपमुख्याध्यापक विजय कचरे, पर्यवेक्षक सुरेश कोवे, प्रविण कारेकार तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


न्यु इंग्लिश हायस्कूलच्या संचालकांचे खेळाडूंना सहकार्य नाही

राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व शाळेचे संचालक खेळाडूंना सहकार्य करत नाही ज्या विद्यार्थ्याला खेळायचे असेल त्यांनी स्वतः स्पर्धेला खेळायला जाण्यासाठी पैसे खर्च करावे तसे हमीपत्र शाळेने खेळाडू यांच्या कडून भरून घेतले विषेश म्हणजे कधीच खेळाडूंना खेळाचे साहित्य सुध्दा देत नाही आदी अशोक पिंपरे, ताठे सर, मोहन देशमुख यांचा काळात मात्र असा प्रकार नव्हता खेळाडूंना स्पर्धा खेळायला जाण्यासाठी शाळेकडून निधी देण्यात येत होता.


गरीब मुलांनी खेळायचे नाही का?

न्यू इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी हॉलीबॉल स्पर्धेसाठी यवतमाळ येथे गेले असता ये जा खर्च खेळाडूंना करावा लागला आता तर दर्यापुर येथे जाण्यासाठी किती पैसे खर्च येईल त्यामुळे अनेक खेळाडूंचे पालक त्यांना पाठवणार नाही आहे परंतु गरीब खेळाडूंचे नुकसान होऊ देणार नाही त्यांना आथिर्क मदत माझ्या सारखे सामाजिक कार्यकर्ता करून देईल असे आश्र्वासन दिले आहे.

गोवर्धन वाघमारे
संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती