
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
शालेय शिक्षण विभाग मध्ये U-DISE+ आॅनलाईन प्रणाली अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. चिंतामणी हायस्कूल कळंब मध्ये तालुक्यातील सर्व व्यवस्थापन शाळेच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे अध्यक्ष शिक्षण विभाग कळंब चे विभाग प्रमुख श्री. अमोल वरसे (गटशिक्षणाधिकारी)होते. श्री. गोडे सर (मु.अ.) श्री. राठोड सर (मु.अ.) श्री. हेडाऊ सर(कें.प्र.) श्रीमती हजारे मँडम (कें.प्र.) श्री.देशमुख सर उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्तपणे U-DISE+ ची अमंलबजावणी केली जाते शाळेतील भौतिक सुविधा, गुणवत्ता, शिष्यवृत्ती, विशेष बालके (दिव्यांग) बाबींचा समावेश वार्षिक अंदाजपत्रक नियोजन (AWP- BUDGET) मध्ये करून सुविधा पुरविण्यात येतात. सदर कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक श्री. संजय निकोडे, श्री. समीर कवडे श्री. सचिन पोटुरकर होते.
कार्यशाळेला गटशिक्षणाधिकारी श्री. अमोल वरसे यांनी U-DISE+प्रणाली बाबत मार्गदर्शन केले. श्रीमती. होमवती पाटील यांनी सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी करीता श्रीमती शगुफ्ता खान श्री. नितीन नस्करी श्री. विवेक गोंडे श्रीमती.तेजस्वीनी रहाटे श्रीमती वानखेडे मँडम यांनी विशेष सहकार्य केले. श्री. रतन गोंडे यांनी उपस्थित मुख्याध्यापक यांचे आभार व्यक्त करून कार्यशाळा संपन्न झाली.
