सुशगंगा पॉलिटेक्निक वणी येथे alumni meet साजरा,वेकोलीचे GM आलोक कुमार यांची प्रमुख उपस्थिती

सुशगंगा पॉलिटेक्निक वणी येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2022 ला
alumni meet साजरा करण्यात आला. कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून WCL वणी North Area चे General Manager मा. श्री आलोक ललित कुमार, प्रमुख पाहुणे मा. श्री प्रदिप बोनगिरवार (अध्यक्ष), मा. पुष्पा राणी (प्राचार्या ) उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक मधे सुशगंगा पॉलिटेक्निक वणी मधे तंत्रनिकेतन शिक्षणाबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करून
देण्या साथी संस्था अविरत कार्यरत आहे. या वेळी प्राचार्या यांनी
विद्यार्थ्यांच्या प्रगती चे कुतूहल करत असताना alumni meet चे मुख्य
विद्यार्थ्याना कौतुकाची थाप दिली. यापैकी विद्यार्थी हे नामांकित कंपनीत कार्य करत आहेत त्यात, coal india limited, L&T, Bajaj Auto Mobile pvt
Itd, Mahindra SK pvt ltd, 3G associated, Primus sam pvt ltd, Tata motors
pvt Ltd, मधे कार्यरत आहे. अध्यक्षपदी भाषण देताना श्री प्रदिप बोनगिरवार
यांनी संस्थेच्या प्रगती ची पावूल वाट दाखवली. मुख्य अतिथी म्हणुन
लाभलेले श्री अलोक ललित कुमार हे WCL मधे वणी north Area चे Area General manager या पदावर कार्य करत आहे, विद्यार्थ्याना प्रोत्साहन देताना त्यांनी टेक्निकल शिक्षणाचा उपयोग किती पद्धतीने करता येतो हे अगदी सोप्या भाषेत पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन (वृषाली कारमोरे मायनिंग च्या विभाग प्रमुख), कुसुम कश्यप ( प्राध्यापिका), कार्यक्रमाचेआभार प्रदर्शन सुजाता परसावार ( इलेक्ट्रॉनिक च्या विभाग प्रमुख) यांनी केले. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात सुशगंगा च्या कर्मचारी वृंद व उपस्थीत विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.