मांगली (हिरापूर) पैनगंगा नदी घाटातून रेतीची खुलेआम चोरी,राजकीय पुढारी रेतीचोरीत झाला सक्रिय

संग्रहित फोटो

महसूल विभाग दुर्लक्ष


तालुका प्रतिनिधी,झरी:

झरी तालुक्यातील मांगली ( हिरापूर) पैनगंगा नदी घाटातून एक आठवड्यापासून खुलेआम दिवस रात्र खुलेआम रेतीचोरी करून ट्रॅक्टर द्वारे वाहतूक करीत आहे. या कडे महसुल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची ओरड ऐकाला मिळत आहे. पैनगंगा नदीचे सर्वात मोठे पात्र असून या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीसाठा असून येथील रेतीचोरी एका पदाचा माजी असलेला पुढारी , तसेच एका लोकप्रतिनिधींच्या मागेपुढे शेपूट हालवणारा तोच रेतीचोरी करीत आहे. सदर पुढारी रेतीचोरीकरीत असल्याबाबत संपूर्ण तालुका वासीयांना व पोलीस तसेच महसूल विभागाला माहीत असून त्या चोरट्यावर कार्यवाही का केल्या जात नाही ? असा प्रश्न उपस्थित करून जनतेत प्रचंड संताप उफाळला आहे. एखाद्या गरीब माणसाने एक पोत घरकामकरिता किंवा इतर कामाकरिता बैलगाडीवर रेती आणली असता त्याला पकडून दंड किंवा गुन्हा दाखक केल्या जातो मग या पुढाऱ्यावर का कार्यवाही केल्या जात नाही असा संतप्त प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. विशेष म्हणजे सदर पुढारीचा मुलगा हा दुचाकीने चोरीच्या रेती ट्रॅक्टरचा पायलटिंग करून आनलेल्या ट्रॅक्टरला घेऊन जातो व आर्डर प्रमाणे खाली करतो. ,एक ब्रास रेती ९ हजार प्रमाणे विक्री करून लाखो रुपये कमविण्याचा गोरखधंदा सुरू आहे. या रेती चोरटयाकडे
तहसीलदार , नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी, व तलाठी व कोतवालांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. सदर पुढारी हा एका लोकप्रतिनिधी च्या पदाचा व नावाचा फायदा उचलून रेेतीचोरी व ठेकेदारी करीत आहे. सर्वत्र पकडण्याकरिता गेलेल्या महसूल किंवा पोलीस
कर्मचारी किंवा अधिकारी यांना लोकप्रतिनिधीच्या नावाची धमकी दाखवून कुणालाही न भीता हा गोरखधंदा सुरू आहे. रेतीचोर पुढारी हा पैनगंगा नदीतून गावापर्यंत जेसीबीने रस्ता बरोबर करून ट्रॅक्टर द्वारे रेतीचोरी करण्याचा बेत आखला आहे. रेतीचोरी मुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून मांगली (हिरापूर) घाटातून रेती चोरी बंद होती परंतु या पुढाऱ्याने रेतीचोरी सुरू केल्याने इतरही चोरटे सक्रिय होण्याची शंका निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी महसूल व पोलीस विभागाने कार्यवाहीची सपाटा लावला होता तेव्हापासून रेतीचोरी बंद झाली होती परंतु आता पुन्हा सुरू झाली आहे. तरी याकडे महसूल व पोलीस विभागाने लक्ष देऊन लोकप्रतिनिधीच्या नावाचा फायदा घेऊन रेतीचोरी करणाऱ्या पुढाऱ्यचे ट्रॅक्टर पकडून कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे
.