
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात मागील दोन तीन वर्षापूर्वी वाघाची मोठी दहशत निर्माण झाली होती तेव्हा नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाली होते नागरिकांमधली वाघाची अद्यापही भीती संपलेली नसतानाच आणखी राळेगाव तालुक्यातील आष्टोना मंगी जंगल शेत शिवारात शेतकरी शेतमजुरांना वाघाचे पॅगमार्क आढळून आल्याने शेतकरी शेतमजुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आष्टोना,मंगी गावातील नागरिकांनी वाघ असल्याबाबतची माहिती पोलीस स्टेशन तसेच वनविभागाला दिली असता वनविभागाचे तसेच पोलीस कर्मचारी पी.एस.मलमकर,के.पी सावरकर,सिडाम साहेब, नैताम मॅडम, मडावी मॅडम ठाणेदार सुखदेव भोरकडे तसेच कर्मचारी यांनी आष्टोना,मंगी जंगल परिसरातील शेतात पाहणी केली असता वाघाचे पगमार्क आढळून तसेच ड्रोन कॅमेरा द्वारे वाघाचा शोध घेतला असता वाघ परिसरात दिसून आलेला नाही.तेव्हा हा वाघ बाजूला असलेल्या जंगल परिसरात गेला नसावा अशी भीती आष्टोना मंगी गावातील नागरिकांत पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.