
सहसंपादक : रामभाऊ भोयर
3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कळंब येथे गृहभेट देऊन तथा पालक मार्गदर्शन जागृतीपर उत्साहात साजरा करण्यात आला .
समावेशित शिक्षण विभाग पंचायत समिती कळंब व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका सौ. सारीका हजारे मॅडम तर प्रमुख पाहुणे श्री .सचिन पोटुरकर (तालुका समन्वयक),श्री विवेक गोंडे (विशेष शिक्षक) सौ रंजना सावळे ( विशेष शिक्षक) उपस्थित होत्या.
श्री विवेक गोंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून लुईस बेल यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना समाजामध्ये दिव्यांगा विद्यार्थ्याबद्दल समावेशित कसे करायचे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
श्री.सचिन पोटूरकर यांनी आपल्या मनोगतामध्ये दिव्यांगाच्या विविध योजना व विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षणाबद्दल निपुण महाराष्ट्र मध्ये सहभाग बाबत मार्गदर्शन केले , सौ.रंजना सावळे यांनी सुद्धा मार्गदर्शन करून उणिवांवर मात करून व्यक्ती यशस्वी होऊ शकतो हे उदाहरणाने दाखवून दिले . कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.सारिका हजारे मुख्याध्यापिका यांनी जागतिक स्तरावर विविध दिव्यांग विद्यार्थ्यांनी कसे प्राविण्य मिळाले याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आपण सुद्धा असेच प्राविण्य मिळवून आपले नाव कीर्तीमान स्थापन करावा याबद्दल मुलाचे मार्गदर्शन तथा प्रेरित केले .
तसेच जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक कन्या शाळा कळंब मधील विद्यार्थिनी यशस्वी पाथरकर आणि भावेश बोरकर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये दिव्यांग प्रवर्गातून प्रथम क्रमांक आल्याबद्दल आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थिनींना सन्मान चिन्ह व बक्षीस देण्यात आले. व शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम मध्ये सांगता करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री. कोपुलवार सर .कु.सोनाली पवार,कु.रुपाली बोंदांडे आयोजन मध्ये विशेष मेहनत घेतली.
