सर्व समाजाला न्याय देत आमदार जवळगावकर यांनी सभागृहासाठी दिले तीन कोटी रुपये

लता फाळके / हदगाव


हदगाव- शहरात सभागृह होण्याकरता अनेक वर्षापासून मागणी होती याच मागणीची दखल घेत आमदार जवळगावकर यांनी सर्व समाजांना न्याय देत शहरातील सभाग्रह करिता तीन कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच ही सभाग्रह बांधण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.
जुने बस स्थानक येथे उर्दू शाळेकरिता तसेच अनेक वर्षापासून मागणी असलेल्या शासकीय विश्रामगृहा च्या पाठीमागील मुस्लिम दफन भूमी ची संरक्षण भिंत उभारण्या करिता निधी देण्यात आलेला आहे त्याचबरोबर वानवडी येथील महादेव मंदिर सभागृह, वार्ड क्रमांक 12 येथील महादेव मंदिर सभाग्रह, वार्ड क्रमांक 9 मधील यशवंनगर येथील मोकळ्या जागेत सभागृह बांधणे, वार्ड क्रमांक 9 मधील अहिल्याबाई होळकर सभाग्रह ची सुधारणा करणे, वार्ड क्रमांक तीन येथे सार्वजनिक गणेश मंडळाच्या समोरील मोकळ्या जागेत सभाग्रह बांधकाम करणे, बंजारा समाजासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभागृह बांधणे याकरिता आमदार जवळगावकर यांनी तीन कोटी रुपये मंजूर केल्याने सर्व समाज बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
97 वर्षापूर्वीची स्थापना असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळ हे शहरातील सर्वच समाज बांधवांचे श्रद्धास्थान आहे हा गणेश मंडळ मानाचा गणेश मंडळ म्हणून ओळखले जातो याच गणेश मंडळा करिता आमदार जवळगावकर यांनी सभागृहासाठी निधी दिल्याने गणेश भक्तांनी आमदार जवळगावकर यांचे आभार व्यक्त केले.
त्याच बरोबर प्राचीन काळापासून असलेल्या वानवडी येथील महादेव मंदिर हे लिंगायत समाजाबरोबर सर्वच समाज बांधवांचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी सभाग्रह होण्याकरिता अनेक नेत्यांनी शब्द देऊन भूमिपूजनही केले होते परंतु सभागृहा करिता निधी प्राप्त होऊ शकला नाही परंतु शब्द न देता आमदार जवळगावकर यांनी सर्व समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेव मंदिराच्या सभागृहासाठी मोठा निधी प्राप्त करून दिल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्याचबरोबर बंजारा समाजासाठी सभागृह होणे गरजेचे असल्याचे लक्षात येताच आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभाग्रह साठी निधी उपलब्ध करून दिला.
हे सर्व पाहता आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सर्व समाजाला न्याय देत शहरातील विविध सभाग्रह करिता तीन कोटी रुपयांची तरतूद करून दिल्याने लवकरच ही सभाग्रह उभी राहतील हे दिसून येत आहे.
त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे येथील समाज मंदिराच्या सभागृहाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार असल्याचेही सांगण्यात आले