
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आदिलाबाद जिल्ह्यातील भेदोडा गावातील ब्रम्हलिन सद्गुरू श्री बाजेराव महाराज यांची चौदावी पुण्यतिथी दिनांक 12/11/2025 रोजी साजरी करण्यात येणार असून या कार्यक्रमात 12 तारखेला ह.भ. प. नानाजी महाराज वैद्य कापशी हे पुजारी म्हणून काम पाहणार आहे.तर दुपारी 1.30 वाजता घटस्थापना ह.भ.प. शामराव भोयर सर महाराज भेदोडा व ह.भ.प. बापूराव महाराज धोटे भेदोडा व समस्त गावकरी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.त्यानंतर सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत हरीपाठ व सामुदायिक प्रार्थना या विषयावर ह.भ. प. विठ्ठल महाराज मुत्यलवार पाटण यांचे प्रवचन असणार आहे.त्यानंतर रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत ह.भ.प. गजानन वाघ महाराज रा.बोरी जिल्हा यवतमाळ यांचे किर्तन असणार.तर दुसऱ्या दिवशी 13 तारखेला सकाळी ठिक सहा ते सात वाजेपर्यंत ह.भ.प. सुनील महाराज दरणे मिर्झापूर यांचे ग्रामगीता वाचन व ध्यानपाठ या विषयावर ह.भ.प. प्रफुल्ल महाराज धोटे भेदोडा यांचे प्रवचन व 9 ते अकरा वाजेपर्यंत पालखी सोहळा संपन्न होणार आहे.तर अकरा ते बारा वाजेपर्यंत ह.भ.प. विलास महाराज कुळसंगे कोठा यांचे किर्तन व पाच मिनिटांचे श्रद्धांजलीपर भाषण राहील तर बारा ते एक वाजेपर्यंत मौन श्रद्धांजली व या विषयावर ह.भ.प. गंभीर महाराज तुडमवार यांचे प्रवचन तर आभार प्रदर्शन अर्चना मधूकर भालेराव माजी सरपंच भेदोडा व सौ वनिताताई मधूकर गोडे व महाप्रसादाचे आयोजन दुपारी ठिक दोन वाजेपासून पाच वाजेपर्यंत संपन्न होणार असून भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
