रिधोरा येथे सततच्या मुसळधार पावसाने घर कोसळले जिवीतहानी टळली

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


  

हाताला काम नाही राहायला घर नाही शंभर टक्के कंच्या मातीचे घर असुन शासन घर द्यायला तयार नाही. नामदेव बळीराम गुरनुले माझे घर सर्वे नुसार कंच्या मातीचे असुन सुद्धा प्रपत्र -अ-१ मध्ये माझे घर ६४ नंबर वर तर पक्के घर वाले ६४ नंबरच्या आत का ? असा प्रश्न नामदेव बळीराम गुरनुले यांनी उपस्थित केला

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल नामदेव बळीराम गूरनूले हा रोजमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे. दोन मुलांचे शिक्षण आपल्या रोजमजुरीतुन करून आपला उदरनिर्वाह करत आहे शेतकऱ्यांना सतंतची ना पीकी होत असल्याने शेतमजूर यांच्या हाताला काम नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत एकही कुटुंब घरकुल पासून वंचित राहणार नाही असे सांगितले होते. परंतु २०२२ संपायला फक्त तीन महिने बाकी आहे.तर तीन महिन्यांत संपूर्ण लाभार्थ्यांना घरकुल मिळनार का ? सदर रिधोरा गावांसाठी आदिवासी लाभार्थ्यांना ४६ तर ओबीसी व इतर लाभार्थ्यांना २६३ असे एकुण ३०९ घरकुल मंजूर करण्यात आले आहे. परंतु वर्षाला १७ ते १८ घरकुल रिधोरा गावांसाठी मंजूर होत असुन या ३०९ घरकुल मधुन फक्त आदिवासी व ओबीसी यांना १८ घरकुल आतापर्यंत देण्यात आले आहेत तर नामदेव बळीराम गुरनुले हे ओबीसी मध्ये मोडत असल्याने यांचा नंबर ६४ वा आहे तर यांना २०२२ मध्ये घरकुल योजनेचा लाभ मिळणार का? असे एक ना अनेक लोक आहेत की ते घरकुल योजनेची वाट बघत आहे परंतु खऱ्या गरजुं लाभार्थ्यां पर्यंत ही योजना पोहचली का? याचा मात्र कुणीही आढावा घेतला नाही आज नामदेव गुरनुले यांची पत्नी सौ.लीलाबाई गुरनुले ही घरामध्ये काम करत असताना काही कामानिमित्त ती बाहेर निघाली बाहेर निघताच कवेलू सह भींत कोसळली. देव टाळी त्याला कोण मारी असे म्हणतात ना ते मात्र आज खरे ठरले आहे. सुदैवाने लीलाबाई बचावली आहे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही परंतु संबंधित विभागाने गावातील खऱ्या गरजुं लाभार्थ्यांना घरकुल या योजनेचा लाभ दिला तर नक्कीच बरे होईल असे रिधोरा येथिल नागरिकांतून बोलल्या जात आहे