शेतकरी लाभार्थी कुटुंबाची अवस्था ना ईधर ना उधर
पाच महिन्यापासून रेशन दुकानातून एपीएल कार्ड धारक शेतकरी लाभापासून वंचित

सहसंपादक:- रामभाऊ भोयर

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मार्च २०२३ मध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत एपीएल शिधापत्रिका कार्ड धारक शेतकऱ्यांना धान्य ऐवजी दर महिन्याला प्रत्येकी १५० रुपये अनुदान दिले जाणार असल्याचे शासनाने जाहीर केलं असले तरी पाच महिन्यांपासून तालुक्यातील एपीएल कार्ड धारक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही अनुदान जमा न झाल्याने एपीएल धारक कार्डधारक शेतकऱ्यांची परिस्थिती ना ईधर ना उधर अशी झालेली दिसून येत आहे.
राळेगाव तालुक्यात एकूण एपीएल कार्ड धारकांची संख्या ४०५३ तर युनिट संख्या १५४६३ एवढी आहे त्यासाठी तहसीलच्या पुरवठा विभागाकडून लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती पूर्ण झाली असून त्याचा अहवाल ही जिल्हा पुरवठा विभाग अधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतु तालुक्यातील एपीएल कार्ड धारकांना अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे एपीएल कार्ड धारकांच्या खात्यात अनुदानाचा लाभ मिळण्यास विलंब झाल्या असल्याने एपीएल कार्ड धारक शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंतोदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारक लाभार्थीसह एपीएल केसरी रेशन कार्डधारक शेतकरी लाभार्थ्यांना दरमहा रेशन दुकानातून सवलतीच्या दरात अन्नधान्याचे वितरण करण्यात येत होते तसेच तालुक्यातील काही लाभार्थी शेती नसताना त्यांची नावे शेतकरी कुटुंबात गेली आहेत त्यांची परिस्थिती तर यांच्याहूनही बिकट झाली आहे. ये लाभार्थी तर कधी रेशन दुकानदाराला तर कधी तहसील कार्यालयात येऊन विचारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही त्यातच पाच महिन्याचा कालावधी संपूनही अद्यापही शेतकरी एपीएल कार्डधारकांनी अनुदान मिळविण्यासाठी आपले विहित नमुन्यात अर्ज पुरवठा विभागाकडे सादर केले नसल्याने अजूनही कार्डधारक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास आणखी किती दिवस लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्यासाठी पुरवठा विभागाने संबंधित रास्त दुकानदार यांना एपीएल कार्ड धारकांकडून विहित नमुन्यात अर्ज सादर करून घेण्याची प्रक्रिया त्वरित राबवून एपीएल कार्ड धारकांच्या खात्यात त्वरित अनुदान जमा होईल असे प्रयत्न करावे अशी मागणी एपीएल कार्ड धारकांकडून केली जात आहे.

१५० रुपये खात्यात जमा होणार
मार्च महिन्यापासून एपीएल लाभार्थ्यांना धान्य ऐवजी प्रति व्यक्ती १५० रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना जानेवारीपासून अनुदानाचे रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र पाच महिने लोटून सुद्धा एपीएल कार्ड धारकांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झालेले नाही

पाच महिन्यापासून रेशन दुकानातून लाभ बंद
जानेवारी २०२३ पासून अंतोदय आणि प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारक त्यांना दरमहा मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असून येथील केशरी रेशन कार्ड शेतकरी लाभार्थ्यांना गेल्या पाच महिन्यापासून रेशन दुकानात मधून लाभ बंद करण्यात आला आहे त्यामुळे एपीएल कार्डधारकांच्या कुटुंबावर उपासमारीचे वेळ आली आहे.

तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज व पुरवठा विभागाकडे सादर करावे
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी पुरवठा विभागाकडे विहित नमुन्यासह अर्ज सादर करावे व अर्जासोबत राशन कार्ड ची झेरॉक्स कुटुंब प्रमुखाचे बँक पासबुक (आधार कार्ड लिंक असलेले) झेरॉक्स व आधार कार्ड झेरॉक्स आदी कागदपत्राची पूर्तता करावी असे आवाहन नायब तहसीलदार किरण किनाके मॅडम यांनी केले आहे