
सहसंपादक : : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता गजानन महाराज मंदिरात अखिल भारतीय गुरूकुंज आश्रम मोझरी (जि. अमरावती) अंतर्गत क्रांतीज्योत यात्रेचे आगमन झाले. यात्रेचे स्वागत भजनाच्या माध्यमातून करण्यात आले. पूर्ण फेरी करून यात्रा मानवता मंदिर झाडगाव येथे पोहोचली.
तेथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व जिल्हा सेवाधिकारी पद्माकर ठाकरे यांनी प्रास्ताविक करून राष्ट्रसंतांच्या भजनातून मार्गदर्शन केले. त्यानंतर प्राचार्य चरडे (चिमूर) यांनी तसेच महाराजांनी भजन सादर केले.
या वेळी क्रांतीची खरी सुरूवात चिमूर तालुक्यातून झाली असल्याचे सांगून १९४२ च्या आंदोलनातील अनेक प्रसंगांचे स्मरण करण्यात आले. “मानवता हाच खरा धर्म असून जातीपाती विसरून सर्वांनी मिळून सामुदायिक प्रार्थना व कार्यक्रम करावेत,” असा संदेश महाराजांनी आपल्या मनोगतातून दिला.
कार्यक्रमाचे संचालन रूपेश रेंघे यांनी केले तर आभार प्रदर्शन हरीदास कुबडे यांनी मानले. या वेळी गुरुदेव सेवा मंडळ राळेगावचे डॉ. ज्ञानेश्वर मुडे, जीवन प्रचारक गणेश फटिंग, बापु शेरअली लालानी, गोपाल भटकर, शंकर पिंपरे, डॉ. काकडे (वडकी), भेदुरकर, भजन मंडळ कोपरी तसेच तालुक्यातील सर्व गुरुदेव मंडळी उपस्थित होती.
राष्ट्रवंदना व जयघोषाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
