चंपाष्टमीनिमित्त सकल धनगर समाज एकत्र, येळकोट येळकोट जय मल्हारचा जय करा

प्रतिनिधी,प्रवीण जोशी
ढाणकी.

धनगर समाजामध्ये मुख्यतः खंडोबाला आपले आराध्य दैवत मांनले जाते. तसेच चंपाष्टमीनिमित्त गावोगावी खंडेरायाच्या नावाने तळी उचलली जाते. त्यानिमित्त सकल धनगर समाज बांधव एकत्र येत असतो. त्याच परंपरेला अनुसरून ढाणकी येथे खंडेरायाची तळी उचलण्यात आली. बऱ्याच गावी प्रत्येक घरी जाऊन खंडेरायाची तळी उचलण्यात येते तर बऱ्याच ठिकाणी खंडोबा रायाचे मंदिर असल्यास सर्व सकल धनगर समाज बांधव एकत्र येऊन खंडोबारायाच्या मंदिरातच तळी उचलतात. ढाणकी येथे मंदिर नसल्यामुळे इथे प्रत्येक घरी जाऊन तळी उचलण्यात येते. जुन्या परंपरेनुसार तुकारामजी वैद्य यांच्या घरी सर्व धनगर समाज बांधव एकत्र जमतात विविध विषयांवर चर्चा होत असते. .
मंदिर बांधकामासाठी वर्गणी जमा केली . अशाप्रकारे डफावर हात टाकत सुमधुर सुरात खंडेरायाची वाघोबा आरती करत असतो. व शिवा मला येळकोट येळकोट या गजरामध्ये खंडेरायाचा भंडारा हा खंडोबावर उधळला जातो. त्याचप्रमाणे कुत्र्या खंडोबा समजून त्याची पूजा आरती केली जाते व त्यास नैवेद्य दिल्या जातो. गुरू पौर्णिमेपासून ते चंपष्टी पर्यंत धनगर समाजाला वांगी खाण्यासाठी मुभा नसते. आज पासून ते गुरू पौर्णिमेपर्यंत आता वांगी खाण्यास जमते.