
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राज्यातील पोलीस पाटील यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील (असो.) संघटना राज्यात कार्य करते.
अमरावती जिल्ह्यातील पोलीस पाटील यांना संघटीत करून आणि त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी संघटनेचे राज्य अध्यक्ष नंदकिशोर हिवसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्य उपाध्यक्ष प्रेमचंद राठोड पाटील, राज्य महासचिव सुजय देशमुख पाटील, राज्य समन्वयक अशोक गेडाम पाटील, राज्य प्रसिध्दी प्रमुख संतोष बोर्डे पाटील, अमरावती विभागीय अध्यक्ष विजय सरदार पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्ष गजानन मोरे पाटील, विदर्भ महासचिव प्रा. टि. बी. रामटेके पाटील, यवतमाळ जिल्हाध्यक्ष मुंकुद कोशेट्टीवार पाटील, वर्धा जिल्हाध्यक्ष सागर पाटील खोंडे, अजय पाटील अर्हाटे नागपूर जिल्हाध्यक्ष अमोल ठाकरे पाटील प्रबोधनकार वैभव निमकर, माजी पत्रकार शशांक चौधरी यांच्या विशेष उपस्थितीत तसेच उपस्थितीत संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष तथा राज्य कार्यकारी अध्यक्ष राहूल उके पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला कर्तव्यदक्ष आदर्श जिल्हा पोलीस पाटील पुरस्कार गावपातळीवर अतुलनीय कार्य करणाऱ्या झिंगापूर तालुका चिखलदरा सुधाकर चिलात्रे पाटील, येवती तालुका नांदगाव खंडेश्वर केशव मेश्राम पाटील, जैनपूर तालुका चांदुर बाजार स्मिता फुके पाटील, समशेरपूर तालुका अजंनगाव-सुर्जी राजेश घोगरे पाटील, सासन बु. तालुका दर्यापूर दिलीप पाखरे पाटील, नजरपूर चांदुर बाजार रावसाहेब चुनडे पाटील, खरबी मांडवगड तालुका चांदूर रेल्वे रामेश्वर मेश्राम पाटील, वाढोना तालुका धामणगाव रेल्वे रुपेश तितरे पाटील, वरखेड तालुका तिवसा नरेश टेकाडे पाटील, निम्मसवाडा तालुका नांदगाव खंडेश्वर सागर भेंडे पाटील, चांदई तालुका दर्यापूर गजानन धुमाळे पाटील तसेच आदर्श महिला पोलीस पाटील पुरस्कार कोठारा तालुका अचलपूर वर्षा जाधव पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संपादक गावरान ९० “प्रविण तायडे” यांना सामाजिक कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी विचार मंचावर विदर्भ समन्वयक प्रदिप मोहतूरे पाटील, विदर्भ उपाध्यक्ष निलाकांत पुसदेकर पाटील, जिल्हा समन्वयक विजय पाटील गायकवाड, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष संदीप पाटील सोळंके, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदिप राऊत पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष साजीद खान पाटील जिल्हा कार्यकारिणी सदस्य विनोद चोपडे पाटील, महिद्रा मेश्राम पाटील, एक्सिस बॅक पदाधिकारी संदीप चौधरी, अनिल गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल मोहेकर आभार नितीन गोरले पाटील तर प्रास्ताविक राहूल उके पाटील यांनी केले, सर्व उपस्थित यांनी याठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष तिवसा रवींद्र मोकदम, चांदुर बाजार श्रीनिवास तायडे, सुनील अलोने, दर्यापूर आशिष गांवडे, चिखलदरा सुधाकर चिलात्रे, नांदगाव खंडेश्वर चंद्रकुमार राणे, अमरावती जयश्री अविनाश पावडे, नरहरी पन्नासे पाटील यांनी यशस्वी नियोजन केले.
राज्यातील पोलीस पाटील संघटना पदाधिकारी सह अमरावती जिल्ह्यातील पोलीस पाटील या कार्यक्रमात उपस्थित होते.
