
जिल्हा प्रतिनिधी/ प्रशांत राहुलवाड
नांदेड जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.२ नोव्हेंबर रोजी माहूरगडला प्रथमच भेट देऊन श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन पूजा/अर्चा केली.दर्शनानंतर संस्थान कार्यालयात संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांनी मातेची प्रतिमा भेट देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव,अरविंद देव, दुर्गादास भोपी व व्यवस्थापक योगेश साबळे यांची उपस्थिती होती.
संस्थानच्या पायथ्याशी श्री रेणूका माऊली माऊली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिगंबर घोगरे पाटील व उपाध्यक्ष गोविंद सुखदेव आराध्ये यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा सत्कार केला.
माहूर शहरात आल्या नंतर शासकीय विश्रागृहावर नगर पंचायतचे मुख्याधिकारी राजकुमार राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला. आजच्या भेटीत जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता वसंत झरीकर,कनिष्ठ अभियंता रवींद्र उमाळे, नगर पंचायतचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
