
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
शेतात रोडचे काम करूनही शेतकऱ्यांना मोबदला नाही 361 बी महामार्ग अपूर्णच राळेगाव कापसी वडनेर असा राळेगाव वरून 361 बी महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग 7 ला जोडण्यात आला आहे 361 बी या महामार्गाचे काम अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे राळेगाव वरून कापसी मार्ग वडणेर ला जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग 361 बी या नावाने ओळखला जातो राळेगाव वरून दोन किलोमीटर अंतरावर या मार्गावरील धोकादायक वळण काढण्याकरिता नऊ शेतकऱ्यांच्या शेतातून मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे 2019 मध्ये त्याचा थ्रीडी करण्यात आला कंपनीने शेतात मोजमाप करून गोटेही गाडले बांधकाम कंपनीने शेतातील काही भागात काम देखील सुरू केले दरम्यान शेतकऱ्यांनी आज ना उद्या शासनाकडून भूसंपादनाचा मोबदला मिळेल या अपेक्षणी आपल्या शेतात रस्ता बांधकाम कंपनीला शेतात काम करण्यासाठी परवानगी दिली परंतु शासनाकडून भूसंपादन मोबदला शेतकऱ्यांना अजून पर्यंत कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही भूसंपादन रकमेचं भिजत घोंगड शासन दरबारी पडून आहे याबाबत ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कंपनीने काम केले त्यांना पावसाळ्यात फार मोठा त्रास सहन करावा लागतो शेतातील बांध कंपनीने फोडल्यामुळे सरळ शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसते त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने या नऊ शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला त्वरित द्यावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची मागणी आहे, याबाबत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांच्या निवाडा शासनाकडे पाठवले असल्याचे सांगितले. आमच्या शेतात रस्ता बांधकाम कंपनीने रस्त्याचे काम सुरू केले पूल देखील टाकला खोदकाम केले त्यामुळे आमच्या शेतात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे खोदकामामुळे संपूर्ण शेत जलमय होते शेतकरी पुरुषोत्तम पिंपरे व प्रथमेश ढोरे यांनी ही माहिती दिली.
