
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
पोळा उत्सव समिती राळेगाव व नगरपंचायत राळेगाव च्या वतीने भव्य बैलपोळ्याच्या आयोजन करण्यात आले होते सायंकाळी पाच वाजता शहरातील सजलेले बैल आठवडी बाजार मैदानात येत होते वाजत गाजत झडत्या म्हणत बाशिंगे बांधून सजलेल्या बैल जोड्या पोळा मैदानावर दाखल झाल्या यावेळी आकर्षक सजावट असलेल्या बैल जोड्यांना बक्षीशी देण्यात आली 5000 रुपयांचे रोग बक्षीस पवन जयस्वाल यांच्याकडून प्राप्त झाले होते नितीन कोल्हे वासुदेव बरापे चंद्रभान शिवरकर पुरुषोत्तम कांबळे प्रवीण दोडके विठ्ठल भागवत वसंत पाल सुभाष विजय राठोड संजय निखाडे राजू नेहारे सुरेश गहरवाल प्रदीप ठुने विनोद नरड सुरेश जुंनघरे सागर उरकुडे गणेश कवटे यां शेतकऱ्यांच्या उत्कृष्ट जोडीना पारितोषकांनी गौरविण्यात आले शेतकऱ्यांना शेती उपयोगी पडणारे फवारणी पंप टॉर्च हॉर्न बक्षीस म्हणून देण्यात आले बक्षिस वितरण सोहळा नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी सर्व नगरसेवक यांच्या उपस्थिती संपन्न झाला.
