
प्रतिनिधी//शेख रमजान
वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षा नीट (NEET-UG) चा निकाल शनिवारी जाहीर झाला असून वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिटरगांव (बु)येथील विद्यार्थी रोहन दामोदर खर्चे यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. बिटरगांव (बु)वसंतराव नाईक कृषि माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथील प्राचार्य दामोदर खर्चे यांचा मुलगा असून त्याने720 पैकी 578 गुण प्राप्त केले आहे. वसंतराव नाईक कृषी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बिटरगांव (बु)
येथील नाव लौकीक केले असून रोहन दामोदर खर्चे या गुणवंत विद्यार्थ्यांचे वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अहिल्यादेवी होळकर स्मारक संस्थेचे सचिव अँड. दिलीप एडतकर, शाळा व्यवस्थापक पुंजाराम डोंगे तसेच संस्थेचे कार्यवाहक अनिल चेंडकाळे, प्राचार्य डी.एम खर्चे, उपमुख्यध्यापक आर यु काटोले, प्राध्यापक एस सी आंडगे एस एस काळे एस एस काळबांडे ए टी माने नरेंद्र दुधे जगदीश वाळूकर गजानन निरटवाड तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी रोहन दामोदर खर्चे याला पुढील भविष्याच्या उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व विद्यार्थ्यांचे कौतुक करुन अभिनंदन केले. तसेच प्राचार्य दामोदर खर्चे व स्वाती दामोदर खर्चे यांचे सुद्धा संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आलेया यशाबद्दल शाळेचे प्राचार्य, शिक्षकवर्ग व नातेवाईक यांनी रोहनचे अभिनंदन केले असून त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
