इंग्रजी माध्यमांच्या स्कूल बसेस आहेत की कोंडवाडा ,मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आणत आहेत विद्यार्थ्यांच्या जीवासोबत हेळसांड

वाहतूक प्रशासनाकडून कारवाई होईल का संतप्त नागरिकांचा सवाल


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ


बंधू आणि भगिनींनो व संपूर्ण
जगाला शांतीचा व समतेचा संदेश देणाऱ्या थोर महापुरुषाचे नाव देऊन ढाणकी परिसरात इंग्रजी शाळेचे अगणित पीक आले असून ज्या विद्यार्थ्यावर संपूर्ण शाळेची अर्थचक्रे व शाळा उभी आहे त्या विद्यार्थ्यांची अशा शाळा स्कूल बस मध्ये अधिक प्रमाणात विद्यार्थ्यांना बसवून हेळसांड व त्यांच्या जीवाशी खेळ करताना ढाणकी परिसरात आढळत आहे
आपली स्वप्न आणि इच्छा बाजूला सारून एकीकडे आपले बाळ पुढे एका अत्यंत प्रचंड स्पर्धा असलेल्या जगात उभे राहणार आहे व त्यात त्याने टिकायला हवे असेल तर बालवाडी नर्सरी पासून जे जे आवश्यक असेल ते करायला हवं असा दृष्टिकोन पालकांनी बाळगणं चूक नाही हाच दृष्टिकोन स्वाभाविक आणि व्यवहार्य आहे अशाच बाबीचा फायदा या शाळा घेत आहेत तसेच स्कूल बस मध्ये अक्षरशः वाजवीपेक्षा जास्त व सर्व नियमांचे उल्लंघन पायमल्ली करून या मुलांना या मोटार गाड्यात आणत असताना शाळेचे मुख्याध्यापक काय कुंभकर्णी झोपेत आहेत का?? त्यांना संस्था चालकाची मुक संमती आहे काय असा प्रश्न सर्व सामान्य पालकांना पडतो आहे तेव्हा अशा दर्जाहीन शाळा विद्यार्थ्याची हेळसांड आणि जीवाशी खेळणाऱ्या शाळा किती दिवस तग धरून राहतील हा सुद्धा मोठा प्रस्न पडतो आहे तसेच प्रादेशिक परिवहन मंडळाने किती विद्यार्थी असायला पाहिजे ती मर्यादा घालून दिली आहे पण याचे कुठेही पालन होताना दिसत नाही सर्व नियम धाब्यावर बसवून संस्था चालकाच्या आशीर्वादाने सगळे काहीं नियम पायदळी घालून सर्रास खचून विद्यार्थ्यांची वाहतूक चालू आहे पहिले शाळा हे ज्ञानार्दनाचे मंदिर असायचे तर संस्थाचालक हे शिक्षण महर्षी असायचे आता चित्र वेगळे दिसत आहे आता सगळे व्यवसायाचे रूप आले असून पैसे कमविणे आणि सुविधा शून्य अशी गत असल्याचे चित्र दिसत आहे तसेच स्वामी विवेकानंद यांनी म्हंटले आहे की उठा जावे व्हा आणि ध्येय साध्य केल्या शिवाय थांबू नका पण आता या अनुसरून पालकांना आता वेगळाच अनुभव येतो आहे उठा जागे व्हा आणि आपल्या पाल्यांना दिलेल्या मोबदल्यात सुविधा मिळत आहेत की नाही ते बघा तसेच साने गुरुजी सारखे गुरुजी नाही तर मदर तेरेसा सारख्या मॅडम नाही आणि पहिल्या सारखे शिक्षण महर्षी संस्थाचालक नाही राहिले सगळ्या लोभी वृत्तीमुळे शिक्षण क्षेत्राचा बोजवारा उडाला आहे तेव्हा या बाबीकडे संबंधित शासकीय यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे