
राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
महात्मा जोतिराव फुले कर्ज मुक्ती योजने अंतर्गत राळेगांव तालूक्यातील ज्या शेतकऱ्यांनी सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षापैकी २ वर्षात कर्ज घेवून कर्जाची मुदतीत परतफेड केली आहे शेतकऱ्यांना शासना तर्फे प्रोत्साहनपर अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. त्या मध्ये राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती बँके तर्फे राळेगांव तालुक्यातील ७१२२ शेतकऱ्यांची माहिती शासनाने पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्या पैकी ४३३४ शेतकऱ्यांची प्रोत्साहनपर अनुदान यादी प्राप्त झाली आहे. प्राप्त यादीतील शेतकऱ्यांना सेतू केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. आधार प्रमाणीकरण करतांना खाते क्रमांक, आधार क्रमांक, कर्ज रक्कम यात तफावत असल्यास तक्रार करावयाची आहे. तक्रार केल्या नंतर कर्ज खाते उतारा, कर्ज खाते पासबूक छायाप्रत, आधार सहकारी संस्था कार्ड छायाप्रत इत्यादी कागद पत्र सहाय्यक निबंधक, राळेगांव कार्यालयास सादर करण्यात यावी. त्यात राळेगांव तालूक्यातील ३०८१ शेतकऱ्यांनी दिनांक १६.१०.२०२२ पर्यंत आधार प्रमाणीकरण केले आहे. तरी शिल्लक असलेल्या १२५३ यादीतील पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे तहसिलदार राहेगाव, व आधार प्रमाणीकरण तात्काळ करण्याबाबत आवाहान कैलास खटारे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, राळेगांव यांचे तर्फे करण्यात आले आहे.
