
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नूतन वर्षाच्या पावन पर्वावर
पवनार येथील बांगडे ले आऊट मधील रवींद्र आंबटकर यांचे निवस्थानी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी संताजी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आली या वेळी
संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे संघटनेच्या वतीने पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले वारकरी संप्रदाय परंपरेनुसार टाळ मृदुंगाच्या गजरात संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन केले या वेळी संताजी महाराज की जय अश्या शब्दाने व हरिनामाने परिसर दुमदुमून उठला
संताजी जगनाडे महाराज हे तेली समाजाचे दैवत असल्याने गेल्या सात वर्षांपासून या कार्यक्रमाचे नियोजन संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था पवनार च्या वतीने करण्यात येत आहे
या मुळे समाजातील एकोपा व मनात आपल्या आराध्य दैवताबद्दल तरुण पिढीला संताचे ज्ञान निर्माण होईल प्रत्येक गावात संताजी जगनाडे महाराज यांची जयंती व पुण्यतिथी साजरी व्हावी त्या मुळे आपल्या समाजाचे दैवत संताजी जगनाडे महाराज असल्याचे सर्वांना ज्ञात होईल या करीता सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे अजूनही बऱ्याच गावांमद्ये संताजीची जयंती व पुण्यतिथी साजरी होत नसल्याचे दिसून येत आहे आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरी प्रत्येक गावात जनजागृती होईल म्हणून संताजीचे कार्य जशे अपार आहे त्याच प्रमाणे संघटनेतून समाजाच्या विकसाकरीता करीता प्रयत्न होणे गरजेचे असल्याचं या वेळी संघटनेच्या माध्यमातून बोलण्यात आले
कार्यक्रमाची सांगता काला व अल्पोहार वितरीत करून दरवर्षी मोठ्या प्रमाणात संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी नियमितपणे साजरी करण्याचा मानस संघटनेच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बाजीराव हिवरे यांच्याकडून करण्यात आले असून यावेळी बाजीराव हिवरे.जगदीश वाघमारे.मुरलीधर वैद्य. विनोद. बोरकर. निलेश डुकरे. गणेश हिवरे. सदानंद रघाटाटे विजया पाहुणे अल्का भुरे रंजना रंजना वैद्य रंजना आंबटकर सीमा साखरकर रेखाताई खेलकर. ज्योती मांजरे छायाताई पेठकर महानंदा हुलके
प्रीतीतिताई देवतळे शोभाताई हुलके उज्वला हिवरे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
