आरोग्य विभागाची भरती रद्द करून परिक्षार्थ्यींना भरपाई द्या:यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसची मागणी

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,यवतमाळ

सार्वजनिक आरोग्य विभागाची परिक्षा २८ फेब्रुवारी २०२१ रोजी घेण्यात आली पण समाजमाध्यमांवर अनेक परिक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे विडिओ उघडकीस आले.
नागपूर येथील काही परिक्षा केंद्रावर परिक्षेच्या वेळेच्या आधीच काही विद्यार्थांना अलग खोलीत प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी देण्यात आल्या होत्या तर काही प्रश्नपत्रिकेचे सील आधीच फुटून असल्याचे निदर्शनास आले.
तर औरंगाबाद येथे परिक्षेसाठी मोबाईलवरून उत्तरे पुरविणारे रॅकेट उघड झाले.
ही अत्यंत गंभीर बाब असतांनाही आरोग्य विभागातर्फे आज निकाल जाहीर करण्यात आला.
यासंदर्भात विद्यार्थ्यांतर्फे सरकारबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे तरीपण ही परिक्षा रद्द करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ही परिक्षा घेण्यात यावी व विद्यार्थांना परिक्षेसाठी आलेला प्रवास व इतर खर्चाची भरपाई देण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव अभिलाष उमरे यांनी मुख्यमंत्र्यांना तहसिलदारांमार्फत केली.यावेळी राज मिसेवार, समिर चंदरने बिपिल चिंतावार संतोष पेंदोर,प्रफुल बिजेवार,संतो ष राऊत,खुशाल भेंडाळे,अमर संकनेतीवार,अखिल कोंडावार,महादेव टेकाम,विलास पस्तुलवार,विक्रम खांडरे,अनुप मेश्राम,मनोज गेडाम,शुभम हामंद,अमित कोमतवार,शुभम जिड्डेवार उपस्थित होते.