राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
आपले गुरुजी या नावाने शिक्षकांची छायाचित्र त्या त्या वर्गखोलीमध्ये सन्मानपूर्वक लावण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांनी दिल्या असून या आदेशानुसार आता वर्ग शिक्षकांचे छायाचित्र वर्ग खोलीमध्ये झळकणार आहे.
जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत आता गुरुजीचे छायाचित्र आपले गुरुजी या सदराखाली लागणार आहे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांच्या प्रती आदराची भावना निर्माण व्हावी या हेतूने हे शिक्षकांचे छायाचित्र लागणार आहे. शाळेत कोणते व किती गुरुजी आहेत त्याची जन्मतारीख शैक्षणिक पात्रता काय आहे याबाबत आता विद्यार्थ्यांनाही कळणार आहे. दोन आठवड्यात छायाचित्र लावण्याची कार्यवाही पूर्ण करावी अशा सूचना सचिव शालेय शिक्षण यांनी दिल्या आहे. शिक्षकांचा फोटो किमान ए फोर आकाराच्या रंगीत असावा फोटो खाली शिक्षकाचे नाव असावे फोटो व्यतिरिक्त शिक्षकांबद्दल अन्य कोणतीही माहिती नसावी असे आदेश नमूद केले आहे तेव्हा आपले गुरुजी या उपक्रमाला किती शिक्षक साथ देतात किती शिक्षक याला विरोध करतात हे लवकरच कळणार आहे.
