
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उप अभियंता यांना निवेदन देऊन ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लावू नये जे स्मार्ट मीटर संमती न घेता लावलेले मीटर त्वरित काढून जुने मिटर लावून देण्यात यावे अशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आली
स्मार्ट शक्तीने लावणे बंद न केल्यास विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटिंग, युवाआडी जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, जेष्ट नेते सुरेशराव आगलावे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तालुकाध्यक्ष गोपाल भोयर, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गिरीश तुरके, मारुतराव बावणे,गीरीधर ठमके, पवन गमे, राहुल महाजन, गजानन कोल्हे, रुपेश झोटिंग, श्रीहरी राजुरकर, प्रहार चे संजय गुरुनुले, सौरभ महाजन,भाष्कर पाटील, गजानन आवरी, किसाना ऊइके, हे ऊपस्थीत होते
