तंटामुक्ती अध्यक्ष पदी नितीन हिवरकर यांची नेमणूक

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु केली.सोमवारी 05 डिसेंबर 2022 रोजी ग्रामपंचायत आदर्श ग्राम रावेरी येथे ग्रामसभा पार पडली.ग्रामसभेमध्ये विविध विषय घेण्यात आले.सोबतच ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा विषय हा प्रामुख्याने घेण्यात आली, त्यात तंटामुक्ती समिती अध्यक्ष म्हणून नितीन हीवरकार यांची निवड करण्यात आली निवडीसाठी, गावातील नागरिकांनी ग्रामसभेसाठी चांगलीच गर्दी केली होती. तंटामुक्त समिती अध्यक्ष साठी गावकऱ्यांकडून नितेश नामदेवराव हिवरकर यांचे नाव सर्व संमतीने सुचविण्यात आले आणि त्यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी जिल्हापरिषद शाळेमध्ये ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सचिव , सरपंच श्री. राजेंद्र तेलंगे, उपसरपंच गजानन झोटिंग, सदस्य विनोद काकडे, रोजगार सेवक विवेक उंडे गणेश बोरेकर , साहेबराव मेसेकर, पद्माकर राऊत, दिनेश बोरकर, भूषण उंडे, मोरेश्वर डाखोरे, शंकर हिवरकर, हनुमान डाखोरे, वामनराव तेलंगे, रमेश चंदनखेडे, श्याम शेळके, रमेश डोंगरे,आदींनी पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.