
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिवसेंदिवस वर्धा नदी पात्रातून तालुक्यात सतत होणारी अवैध रेती वाहतुकीला चाप बसविण्याकरिता महसूल विभागाने कंबर कसली असून दररोज एक ना एक अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले जात आहे.
आज दिं. 6 एप्रिल 2025 रोज रविवारला महसूल विभागाच्या पथकाने सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान मौजा अंतरगाव येथे अरुण पंढरीनाथ कोल्हे राहणार जागजई यांच्या मालकीचा ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एम एच 29 बीपी 5476 हा ट्रॅक्टर रेती वाहतूक करीत असताना पकडला असून ही कारवाई नरेंद्र हलामी निवासी नायब तहसीलदार, एम. डी. सानप मंडळ अधिकारी शिवाणी सातोकर ग्राम महसूल अधिकारी धानोरा ग्राम महसूल अधिकारी, सुनिल कु-हे यांनी अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केला असून सदर ट्रॅक्टरचा पंचनामा करुन पुढील दंडात्मक कारवाई करिता तहसील कार्यालय राळेगांव येथे जमा करण्यात आला आहे.
