
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
भारतातील एकमेव असलेले सीता मंदिर हे राळेगाव तालुक्यातील ठिकाणावरून अवघ्या तीन किलोमीटर असलेल्या रावेरी गावात असून तेथे सीतामाता मूर्तीची पुनर्स्थापना सोहळा दिनांक 5/11/2023 रोज रविवारला सकाळी नऊ वाजता असल्याने त्या कार्यक्रमाचे औचित्य साधून दिनांक 2/11/2023 रोज गुरुवारला रात्री आठ वाजता श्री संत एकनाथ महाराजांचे रंगीत संगीतमय भारुड गणेशजी शिंदे नेरी यांचे असणार असून दिनांक 3/ 11 /2023 ला देवीचा जागर यवतमाळ येथील जितू पाखरे यांचे असून दिनांक 4 /11 /2023 रोजी होम येद्यांचा कार्यक्रमाचे आयोजन व ज्ञानेश्वर महाराज आळंदीकर यांचे रात्री आठ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम असणार आहे, तसेच दिनांक 5/ 11/ 2023 रोजी सीतामाता मूर्तीची पुनर्स्थापना व महाप्रसादाचे आयोजन सीतामाता मंदिर कमिटी व समस्त रावेरी येथील ग्रामस्थ यांनी केले आहे, तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्यात यावा अशी विनंती सीतामाता मंदिर कमिटी तर्फे करण्यात येत आहे.
