
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दि. विदर्भ को. आप. मार्केटिंग फेडरेशन गणेशपेठ नागपूर शाखा यवतमाळ मार्फत राळेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ राळेगाव येथील कार्यालयात 21/1/2026 पासून तुर खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली असून तुरीचा हमीभाव 8000 रूपये जाहीर झाला असून नोंदणीची वेळ कार्यालयीन वेळेत सकाळी ठिक 11 वाजेपासून 5.00 वाजेपर्यंत असून नोंदणीसाठी आवश्यक ती कागदपत्रे नोंदणी अर्ज, अद्यावत 7/12 सन 2025-26 तुर ई पिक पेरा असलेला, आधार कार्ड झेरॉक्स, शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी स्वतः हजर राहून थम्ब ,फिंगरप्रिंट व ओ.टी.पी.द्यावा लागेल.न दिल्यास नोंदणी होणार नाही. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार फक्त एफ.ए.क्यू. दर्जाचा माल खरेदी करण्यात येईल. तरी शेतकरी बांधवांनी संपर्क साधावा असे आवाहन खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक संजय जुमडे व लेखापाल गणेश हिवरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
