उत्पन्न नाही आणि भावही नाही,यावर्षी अतिवृष्टीचाही जोरदार फटका; कपाशी, सोयाबीनची अवस्था बिकट

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

दिवाळी ही चार दिवसावर येऊन ठेवली आहेत अशास्थितीत तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या कपाशी आणि सोयाबीनची अवस्था ही अतिशय बिकट आहे उत्पन्नही नाही आणि भावही नाही अशा स्थितीत तालुक्यातील दोन्ही मुख्य पीक सापडले आहे ।।।।काही शेतकऱ्यांच्या सीतादही झाल्या पण त्यातून निघालेले उत्पन्न हे अतिशय तोकडे आहे दुसरीकडे कपाशीचा भाव हा सात हजाराच्या आसपास फिरतो आहे तसेच सोयाबीनचे आहेत एकरी दोन क्विंटल पासून सोयाबीनचे उत्पन्न आहेत तर सोयाबीनचा भाव हा चार ते साडेचार हजार रुपये भोवती फिरतो आहे त्यामुळे कपाशी आणि सोयाबीनला भावही नाही व उत्पन्नही नाही अशी अवस्था आहेत यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला कपाशीची स्थिती ही अतिशय चांगली होती भरघोस उत्पन्न होणार अशी कपाशीची अवस्था होती पण मधल्या काळात कपाशी ऐन भरात असताना जो पाऊस झाला त्यामुळे कपाशीला असलेले पाते फुल मोठ्या प्रमाणात गळाली त्यामुळे मधल्या काळात कपाशीला जी बोंड लागायची ती बोंड यावर्षी लागलीच नाही सुरुवातीला पाती फुल बोण्ड कमी होती नंतर पाण्याने व्यत्यय आणल्याने कपाशीचा पूर्ण फ्लॅश उतरून टाकला आणि आज कपाशी ही पाण्यावरती आली आहे तर पाणी नाही दोन-तीन वेळा कपाशीला नको असताना पाऊस झाला व हवे असताना पाऊस न झाल्याने कपाशीला पाहिजे तसा मालच यावर्षी नाही दरवर्षीचा विचार केला तर सीतादहीमध्ये शेतकऱ्याला बऱ्यापैकी कापूस निघतो यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांना एकरी एक क्विंटल सीता देवी निघाली आहेत काही शेतकऱ्यांची अजून सीतादही सुद्धा झाली नाहीत म्हणजेच अजून कापूस घरीच आला नाही आणि पुढे कमी येण्याची आशा आहे त्यामुळे कापसाचे उत्पादन यावर्षी मोठ्या प्रमाणात घटेल अशी सध्या तरी स्थिती आहे आणि यात बदल होण्याची फारशी अपेक्षा शेतकऱ्यांना नाही कारण आता कापसाचा हंगाम हा एक-दोन महिन्यावर येऊन ठेपला आहेत त्यामुळे कापसाचे उत्पादन यावर्षी निश्चितच कमी होईल अशी स्थिती आहेत बरड जमिनीवरील शेती ची अवस्था तर अतिशय बिकट आहे त्यांच्या कपाशीला आठ-दहा बोंड लागले व ते फुटले सुद्धा आणि आता कपाशीला पाती फुलं नाही आणि बोंडही नाहीत दिवाळीतच या कपाशीची उलंगवाडी झाली दोन वर्षांपूर्वी 14000 वर गेलेले कापसाचे भाव हे या वर्षी सात हजारावर आले आहेत गेल्या वर्षी सुरुवातीला नऊ हजार वगैरे भाव होते पण हंगाम संपता संपता तेही 7000 वर आले होते अनेक शेतकऱ्यांना गेल्यावर्षी सुद्धा सात हजार रुपये क्विंटलला कापूस विकावा लागला याही वर्षी कापसाच्या हंगामाची सुरुवात सात हजार रुपये भावाने झाली म्हणजेच या वर्षी सुद्धा कापसाला भाव नाही कापसाला समाधानकारक भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित काही प्रमाणात जुळले असते पण उत्पन्न नाही आणि भरीस भर भावही नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहेत सोयाबीनच्या अवस्था अशीच आहे बोटावर मोजण्या इतक्या काही शेतकऱ्यांना सोडले तर इतर बहुतांश शेतकऱ्यांना सोयाबीन झालेच नाही एका काळात सोयाबीनचा दर दहा हजारावरती गेला होता तो आता चार साडेचार हजार भोवती फिरतो म्हणजेच कपाशी प्रमाणे सोयाबीनचे सुद्धा झाले आहेत तालुक्यातील दोन्ही मुख्य पीक कपाशी आणि सोयाबीनला उत्पन्नही नाही आणि भावही नाही असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावरती आली आहेत अस्मानी संकटाबरोबरच सुलतानी संकटाचा सामना सुद्धा शेतकऱ्यांना या रूपाने करावा लागत आहे.