सहसंपादक : रामभाऊ भोयर
मोहदा – प्रजासत्ताक दिनानिमित्त मोहदा येथे आयोजित ग्रामसभेत विकासकामांच्या नावाखाली काही तरुणांनी गोंधळ घालून प्रशासकीय कामात अडथळा आणल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, गोंधळ घालणारे हे तरुण गावातील सक्रिय रेती तस्कर असून, आपल्या बेकायदेशीर कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी त्यांनी पोलीस पाटलांना लक्ष्य केल्याची चर्चा आता गावात रंगू लागली आहे.
नेमकी घटना काय?
२६ जानेवारी रोजी मोहदा ग्रामपंचायतीची सभा सरपंच अक्षय मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती. सभा शांततेत सुरू असताना आकाश गजानन जिरे व त्याच्या काही साथीदारांनी प्रश्नांचा भडिमार सुरू केला. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रश्न विकासासाठी नसून उपस्थित कर्मचारी आणि पोलीस पाटील यांना डिवचण्यासाठी होते. पोलीस पाटील पीयूष गब्रानी यांनी सभेची शांतता राखण्यासाठी संबंधितांना समज देण्याचा प्रयत्न केला असता, या तरुणांनी त्यांच्याशी हुज्जत घालून सभेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.
गुन्हेगारी पार्श्वभूमी चर्चेत
ग्रामसभेत वाद घालणारे हे तरुण केवळ सामान्य नागरिक नसून, त्यांच्यावर रेती तस्करी व इतर बेकायदेशीर कामांशी संबंधित गुन्हे 324 सारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रशासनावर दबाव निर्माण करून आपले ‘रेती तस्करी’चे धंदे निर्धास्तपणे चालवता यावेत, या हेतूनेच त्यांनी ग्रामसभेचा व्यासपीठ वापरून पोलीस पाटलांवर खोटे आरोप लावल्याचे बोलले जात आहे.
ग्रामस्थांमध्ये संताप
एकीकडे हे तरुण लोकशाहीचा हवाला देत असले, तरी दुसरीकडे त्यांच्या स्वतःच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सामान्य ग्रामस्थ त्रस्त आहेत. सभेचे गांभीर्य नष्ट करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.
तपासाची मागणी यात संपूर्ण घटनांचा विडिओ न दाखवता फक्त बदनामी होईल इतकाच विडिओ वायरल केला असल्याचे तक्रारीत नमूद आहे ,पूर्ण विडिओ पाहल्यास घटना क्रम लक्ष्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही
या प्रकरणाची केवळ एका बाजूने चौकशी न करता, गोंधळ घालणाऱ्या तरुणांचे मागील पोलीस रेकॉर्ड आणि त्यांचा रेती तस्करीतील सहभाग याचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडून केली जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे मोहदा परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
