
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील वेडशी गावातील युवा सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक आशिष भाऊ भोयर यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला.
आशिष भाऊ भोयर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवेच्या माध्यमातून उल्लेखनीय सामाजिक कार्य उभे केले असून गरजू, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे वेडशी परिसरात त्यांची एक विश्वासार्ह सामाजिक ओळख निर्माण झाली आहे.
या पक्षप्रवेशामुळे राळेगाव तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाला मोठी ताकद मिळाली असून संघटनात्मकदृष्ट्या पक्ष अधिक मजबूत झाला आहे. तळागाळातील कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांमध्ये या प्रवेशामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वसामान्य जनतेची कामे अधिक प्रभावीपणे मार्गी लागतील, विकासकामांना गती मिळेल तसेच तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देता येईल, असा विश्वास आशिष भाऊ भोयर यांनी यावेळी व्यक्त केला.
आशिष भाऊ भोयर यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश हा पक्षासाठी बळ देणारा निर्णय आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारा हा युवा चेहरा पक्षाच्या कार्याला नवी दिशा देईल. त्यांच्या राजकीय प्रवासास मनःपूर्वक शुभेच्छा.
— अमित ढोबळे
अखिल भारतीय आदिवासी संघटना,यवतमाळ जिल्हा अध्यक्ष
