
सहसंपादक : रामभाऊ भोयर
केंद्र सरकारने सन २०२५-२६ या वर्षासाठी कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये हमी दर घोषित केला आहे. भारतीय कापूस निगम लिमिटेड सीसीआय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने या हंगामातील कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया १ सप्टेंबर पासून सुरू झाली असून किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत कापूस विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यंदा कपास किसान हे मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे या ॲप वर १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान नोंदणी करता येणार आहे तेव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपास किसान ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून कापूस विक्री करिता आपली ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोवर्धन वाघमारे यांनी केले आहे.
गतवर्षी हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे दर हमीदरापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांनी सीसीआयला हमीदराने कापूस विक्री करण्याला पसंती दिली होती ७००० ते ७५१० एवढ्या रुपये दराने शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी केली होती त्यामुळे शेतकऱ्यांकडून सीसीआयने मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी केली होती. परंतु यावर्षी केंद्र सरकारने सन २०२५-२६ या वर्षासाठी कापसाला. ८११० रुपये हमी दर जाहीर केला आहे. सीसीआयकडून येणाऱ्या वर्षातील कापूस हंगामाची तयारी सुरू केली असून आम्ही दराने कापूस विक्री करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांसाठी अटी शर्ती जाहीर केल्या आहेत.
कापूस विक्री करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे सुलभ व्हावे यासाठी सीसीआयने कपास किसान हे ॲप उपलब्ध करून दिले आहे या यावर शेतकऱ्यांना स्वतः आपल्या मोबाईलवरून नोंदणी करता येणार आहे कपास किसान हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि एप्पल स्टोर वरून डाऊनलोड करून घ्यावे.या ॲपवरून कापूस नोंदणीला १ सप्टेंबर २०२५ पासून सुरुवात झाली असून अंतिम मुदत ३० सप्टेंबर पर्यंत राहणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्राची यादी सीसीआयने जाहीर केली आहे नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत कापूस विक्री करता येणार नसल्याचे सीसीआयने स्पष्ट केले आहे.तेव्हा शेतकऱ्यांनी हमी दराने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आले असून त्या पुढील प्रमाणे कापसाची ई पिक पाहणी करणे, सातबारावर कापसाची नोंद करणे, पासबुक पेमेंट ला आधार लिंक,असणे आवश्यक आहे.तसेच आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे, पोस्ट बँक मध्ये खाते असल्यास त्याची पैसे स्वीकारण्याची मर्यादा वाढवलेली असणे आवश्यक आहे आधी प्रकारच्या अटी सीसीआय कडून करण्यात आल्या असून शेतकऱ्यांनी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी आपली ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले
शेतकऱ्यांनी आपली नोंदणी वेळेपूर्वीच करावी
सीसीआयने कापूस हंगामासाठी उपलब्ध करून दिलेला कपास किसान ॲप डाऊनलोड करून शेतकऱ्यांनी दिलेल्या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करावी
संचालक
गोवर्धन वाघमारे कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव
